instant noodles health risks google
लाईफस्टाईल

Instant Noodles: आठवड्यातून दोन वेळा नूडल्स खाताय? आताच व्हा सावध , अन्यथा 'या' गंभीर आजाराचा वाढेल धोका

Instant Noodles Side Effects: अभ्यासात आढळले की आठवड्यातून २-३ वेळा इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने सोडियम आणि चरबीचे प्रमाण वाढून हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका लक्षणीय वाढतो.

Sakshi Sunil Jadhav

  • आठवड्यातून २-३ वेळा इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने हाय सोडियम आणि चरबीमुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

  • नूडल्समधील प्रक्रिया केलेले घटक आणि चरबी कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब वाढवतात.

  • नूडल्समध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्याने नियमित सेवनामुळे एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

बदलत्या जीवनशैलीमुळे सगळ्यांनाच बाहेरचे जंक फूड जास्त प्रमाणात आवडायला लागले आहेत. कोणतीही पार्टी असो वाढदिवस असो सगळ्यांनाच मेन्यूमध्ये चायनीज फूड हवे असतात. त्यामध्ये नुडल्सचा समावेश केला जातो. मात्र याचा तुमच्या जीवाला धोका आहे. असे संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने हेल्थवर गंभीर परिणाम होतात. इन्स्टंट नूडल्समध्ये असलेले अतिसोडियम, संतृप्त फॅट्स आणि प्रक्रिया केलेले घटक हे हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढवणारे प्रमुख कारण ठरतात.

एका सर्व्हिंगमध्येच दिवसाच्या शिफारस केलेल्या सोडियमपैकी मोठा भाग असतो. इतकं जास्त मीठ शरीरात गेल्याने थेट उच्च रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाब हा हृदयविकार आणि स्ट्रोकसाठी महत्त्वाचा धोका मानला जातो. त्यातच नूडल्समध्ये असलेले फॅट्स आणि प्रक्रिया केलेले घटक कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात आणि लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकतात. ही दोन्ही स्थिती मधुमेहाचा डायबेटीजचा धोका आणखी वाढवतात.

जास्त सोडियम, फॅट्स आणि प्रक्रिया केलेले घटक यांचे एकत्रित सेवन मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढवते. या स्थितीत उच्च रक्तदाब, जास्त रक्तातील साखर, पोटाभोवती फॅट जमा होणे आणि असामान्य कोलेस्टेरॉल पातळी अशी अनेक लक्षणे दिसतात. ही सर्व लक्षणे पुढे जाऊन हृदयरोग, स्ट्रोक आणि डायबेटीजसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात.

याशिवाय, इन्स्टंट नूडल्समध्ये आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता असते. त्यामुळे त्यांचे नियमित सेवन केल्याने शरीराला आवश्यक पौष्टिकता मिळत नाही आणि एकूणच आरोग्य खालावण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या मते, इन्स्टंट नूडल्सची सवय नियंत्रित करणे आणि त्यांच्या जागी पौष्टिक, घरगुती पर्यायांचा समावेश करणे जास्त सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT