Junk Food Bad Habits Saam Tv
लाईफस्टाईल

Junk Food Bad Habits : युवा पिढीमध्ये वाढतेय जंक फूड खाण्याची क्रेझ! आरोग्यासाठी ठरतेय अधिक घातक; स्टडीमधून धक्कादायक खुलासा

How Fast Food Affects Health : चटपटीत आणि त्यांची चव जिभेवर रेंगाळणारी असली तरी या जंकफूडमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात.

कोमल दामुद्रे

Teen is Addicted to Junk Food :

सध्या धावपळीच्या युगात आपण पाश्चिमात्य संस्कृतीकडे अधिक प्रमाणात वळलो आहोत. त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जंकफूड. हल्ली रस्त्यापासून अनेक महागड्या हॉटेलमध्ये जंकफूडची चव चाखायला मिळते.

ही जंकफूडची संस्कृती फक्त शहारपुरती मर्यादित नसून ती ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशातच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. लहान मुलांपेक्षा युवा पिढीमध्ये जंकफूडचे सेवन अधिक प्रमाणात वाढले आहे.

हे पदार्थ चटपटीत आणि त्यांची चव जिभेवर रेंगाळणारी असली तरी या जंकफूडमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे समोर आले आहे.

तज्ज्ञ सांगतात की, जंक फूड म्हणजेच अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या (Food) व्यसनाला लहान मुलांपेक्षा जास्त बळी पडत आहेत. ही अधिक चिंतेची बाब आहे. कारण आरोग्याच्या (Health) दृष्टीकोनातून हानिकारक असलेल्या खाद्यपदार्थांची क्रेझ वाढत आहे.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रात असे म्हटले आहे. अमेरिका, ब्राझील आणि स्पेनमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, 14 टक्के प्रौढ आणि 12 टक्के मुलांमध्ये जंक फूडची क्रेझ अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे तरुणाईंमध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह (Diabetes), कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांना बळी पडत आहे. 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सचे प्रमाण जास्त आहे, त्यात कँडी, आइस्क्रीम, फ्राईज, चिप्स, बर्गर, कॅन केलेला अन्न, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट, पॅकेज केलेले सूप, चिकन नगेट्स, हॉटडॉग्स आणि बरेच काही समाविष्ट आहे. अशा पदार्थांना अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणतात.

संशोधकांच्या मते, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, टाइप-2 मधुमेह आणि कर्करोगाचा धोका वाढवते. याचा अन्नपदार्थांचा वापर यूके आणि अमेरिकेत निम्म्याहून अधिक आहे तर भारतासारख्या देशांमध्येही त्याचा झपाट्याने वापर वाढत आहे.

1. भारतीय मुलांसाठी अधिक धोका:

डब्ल्यूएचओ, युनिसेफ आणि लॅन्सेट आयोगाने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की प्रदूषण आणि हवामान बदलाबरोबरच जंक फूड देखील भारतीय मुलांच्या जीवनाला मोठा धोका आहे. जे लोक जास्त तळलेले अन्न खातात त्यांना मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका जास्त असतो. डब्ल्यूएचओच्या मते, दरवर्षी अति मीठ (सोडियम) सेवनाने जगात 30 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. इतकेच नाही तर त्यामुळे रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोकाही वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT