Chips and Burgers Damage Children's Brain saam tv
लाईफस्टाईल

Junk Food Risks : चिप्स-बर्गरची सवय मुलांच्या मेंदूला करतेय खिळखिळी, नवीन संशोधनातील धक्कादायक माहिती

Chips and Burgers Damage Children's Brain : चिप्सचे पॅकेट खाणे,बिस्किटं खाणे किंवा बाहेर कधीतरी बर्गर खाणे सामान्य वाटते. पण अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स मुलांच्या मेंदूवर लक्षणीय परिणाम होत आहे.

Saam TV News

शाळेनंतर चिप्स खाणे, संध्याकाळी बिस्किटं खाणे किंवा चवीने बर्गर खाणे ही जरी आजकालच्या मुलांची सामान्य सवय झाली असली, तरी यामुळे त्यांच्या केवळ शरीरावरच नव्हे, तर थेट मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्समुळे मुलांच्या मेंदूची रचना आणि विचार करण्याची पद्धत कशी बदलत आहे, याचा एक मोठा इशारा या अभ्यासात देण्यात आला आहे.साधारणपणे आपण प्रोसेस्ड फूड्सना फक्त लठ्ठपणाशी जोडतो, पण त्याचा थेट संबंध मुलांच्या मेंदूशी असल्याचे समोर आले आहे. तसेच, जंक फूड खाणाऱ्या मुलांमध्ये पुढील एका वर्षात चरबी वेगाने वाढू शकते.जाणून घ्या कशा प्रकारे याचा मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो

मेंदूचा रिवॉर्ड सिस्टीम सक्रिय होणे

ज्या मुलांच्या रोजच्या आहारात प्रोसेस्ड फूड्सचे प्रमाण जास्त होते, त्यांना कुकीज आणि फ्रेंच फ्राईजसारखे पदार्थ खाल्ल्यावर त्यांच्या मेंदूचा रिवॉर्ड, प्रेरणा आणि सवयींशी जोडलेला भाग अधिक सक्रिय होतो.

वजन आणि शरीराची चरबी वाढणे

प्रोसेस्ड फूड्सचे प्रमाण जास्त झाल्याने पुढील एका वर्षात त्या मुलांच्या शरीरातील चरबीमध्ये मोठी वाढ दिसून आली. तसेच त्यांची कंबरही रुंद झालेली आढळली.

जंक फूड मुलांच्या मेंदूला बदलत आहे का?

या निष्कर्षांमुळे सतत असे अन्न खाल्ल्याने मुलांमध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी वाढू शकतात. मात्र, मुले या अन्नाचे खरोखरच व्यसनी झाली आहेत किंवा जंक फूड त्यांच्या मेंदूत थेट बदल करत आहे, हे या अभ्यासातून पूर्णपणे सिद्ध झाले नाही.

यामागे फक्त साखरच जबाबदार नाही

या संपूर्ण प्रक्रियेसाठी केवळ साखरच जबाबदार नाही, असे संशोधनात आढळले आहे. अनेक प्रोसेस्ड फूड्समध्ये फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सचे मिश्रण असते, ज्यामुळे मेंदूत रिवॉर्ड रिएक्शन तयार होते. मात्र,साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन तपासणी केली असता, प्रोसेस्ड फूड आणि मेंदूच्या प्रतिक्रियेमधील संबंध काहीसा कमी झाल्याचे दिसून आले, ज्यावरून यामागे इतर अनेक घटक देखील कारणीभूत असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Railway Accident : रेल्वेचा भीषण अपघात! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले ७ डब्बे; पाहा Video

Phulwara: 'घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!'; रवी जाधव यांच्या 'फुलवरा'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

EPFO WhatsApp Service : WhatsApp वर 'Hi' पाठवूनही PF माहिती मिळेना; EPFO ची नवी सेवा पहिल्याच दिवशी कोलमडली

दिवाळीची साफसफाई पडली महागात! ॲपवरून बोलावलेल्या कामगारांनी सोने-चांदीवर मारला डल्ला, मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT