symptoms of uric acid, Uric Acid Problem  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

शरीरात यूरिक अ‍ॅसिड कसे वाढते? त्याचे लक्षण व कारणे कोणती ?

महिला व पुरुष वर्गामध्ये हल्ली यूरिक अॅसिडची समस्या वाढताना दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महिला व पुरुष वर्गामध्ये हल्ली यूरिक अॅसिडची समस्या वाढताना दिसून येत आहे. आपल्या सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला आणि तो बरा होत नसेल तर समजावे यूरिक अॅसिडची समस्या आपल्या शरीरात वाढू लागली आहे.

हे देखील पहा -

हल्ली हा त्रास तरुणांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वांना जाणवत आहे. किडनीच्या साहाय्याने यूरिक अॅसिड साफ होण्यास मदत होते जे की आपल्या मूत्राद्वारे बाहेर पडते. जेवणात चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील यूरिक अॅसिड निघत नसेल तर त्याचे प्रमाण आपल्या शरीरात वाढू लागते व त्याचे प्रमाण रक्तातही दिसते. यूरिक अॅसिडची पातळी अधिक वाढत असेल तर त्याला हायपरयुरिसेमिया देखील म्हटले जाते. आपल्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर आपण कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करु नये हे जाणून घेऊया.

यूरिक अॅसिड वाढण्याचे लक्षण -

कधी कधी अधिक वाढणारे यूरिक अॅसिड आपल्याला दिसत नाही. बदलेली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयींमुळे यूरिक अॅसिड वाढू लागते. जर आपल्या रक्तात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढले तर आपल्याला किडनीची समस्या किंवा त्याच्या गाठी शरीरात निर्माण होतात. त्यामुळे आपली टाच किंवा हाता-पायाची बोटे सुजू लागतात. त्यामुळे चालण्यास व काही काम करण्यास त्रास जाणवू लागतो. ज्यामुळे यूरिक अॅसिडचे प्रमाण शरीरात वाढत असेल असे पदार्थ (Food) बंद करा.

कारणे-

- चुकीच्या आहारामुळे शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढू लागते.

- हा आजार आनुवांशिक देखील असू शकतो.

- वाढलेल्या वजनामुळे ही समस्या उद्भवू शकते. तसेच जास्त ताणतणाव आल्यास शरीरात अॅसिड जमा होऊ लागते.

- मूत्रपिंड व मधुमेह (Diabetes) वाढल्यास हा त्रास जाणवू लागतो. त्वचा रोग देखील यूरिक अॅसिड वाढण्याचे कारण आहे.

या पदार्थांचे सेवन करणे टाळा -

युरिक ऍसिड असलेल्यांनी कडधान्ये खाणे टाळावे. मसूर, राजमा, हरभरा आणि चणे या पदार्थांचे सेवन करु नये. लघवीचे प्रमाण जास्त असल्याने वेदना आणि सूज येण्याची समस्या वाढू शकते. मूग डाळीचे नियमित सेवन केल्याने युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM फडणवीसांनी काल 'आदेश' दिला; आज पोलिसांनी भाजप नेत्यालाच उचललं!

Maharashtra Live News Update : पुण्यात भररस्त्यात भांडणं करून टेम्पोची तोडफोड करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Shocking : बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, दरवाजा तोडला, आतील दृश्य बघून सगळेच हादरले; आई आणि ४ मुलं निपचित पडली होती...

Maharashtra Politics: ते पाकिस्तानलाही सोबत घेतील; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा,ऑक्टोबरचे ₹१५०० कधी येणार?

SCROLL FOR NEXT