मुंबई : कामाचा वाढलेला व्याप, ताणतणाव व बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्या आहारात अनेक बदल होत असतात. हल्ली जगभरात धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे.
हे देखील पहा -
शाळा (School), कॉलेज, तरुण व वयोवृध्द पिढीला धुम्रपानाचा विळखा अधिक प्रमाणात बसला आहे. धुम्रपानाचे सेवन करण्यात जितका पुरुष वर्ग आहे तितकेच जास्त प्रमाण स्त्रियांचे देखील आहे. धुम्रपानाची सवय एकदा जडली की, तो आजार बनत जातो कितीही प्रयत्न केले तरीदेखील ती सवय सुटत नाही. धुम्रपानाचे सेवन केल्याने शरीरातील इतर अवयवांना नुकसान होते. तसेच हृदय, किडनी, मेंदू व आतड्यांवर त्याचा विपरित परिणाम होतो. सिगरेटमध्ये निकोटीन असते त्याचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. तसेच हृदयविकाराचा (Heart attack) किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. सिगरेटचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या.
१. सिगरेटचा धूर आपल्या शरीरात गेल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या आतड्यांवर होतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होते. सध्या दूषित वातावरणामुळे व सिगरेटच्या धूरामुळे आतड्यांची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे आपल्याला कर्करोगासारखा आजार होऊ शकतो. तसेच अधिक प्रमाणात सिगरेट प्यायल्याने आतजे खराब होतात.
२. मधुमेह व ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांनी सिगरेटचे सेवन करु नये. श्वसनासंबंधित किंवा इतर अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. सिगरेटच्या धूरामुळे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास अधिक जाणवू लागतो.
सिगरेटपासून सुटका कशी कराल ?
सतत सिगरेट पिणाऱ्या लोकांनी ती हळूहळू कमी करायला हवी. हे व्यसन सोडवण्यासाठी निकोटीन पॅच, च्युइंग गम आणि निकोटीन बबलगम यांचा अवलंब करू शकतो. तसेच बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.