Office Hair Style  Saam Tv
लाईफस्टाईल

Office Hair Style : ऑफिस लूक मेनटेन ठेवायचाय आणि उशीरही होतोय? ही झटपट हेअर स्टाईल राहील बेस्ट

Shraddha Thik

Office Tips : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सगळेच घाईत असतात. तसेच रोज ऑफिसला जाताना आपल्या तयारीच्या वेळी वेळेचे भान ठेऊन तयारी करावी लागते. प्रत्येक वेळी ऑफिसला जाताना वेळेच्या कमतरतेमुळे अनेकदा लोक त्यांच्या केसांना विशेष लुक देऊ शकत नाहीत.

अशा वेळी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, फक्त ट्रेंडी (Trendy) लुकसाठी काही हेअर स्टाईचा अवलंब करा. तर, आज काही ट्रेंडी हेअरस्टाइल्सबद्दल पाहूयात. ज्या तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वी काही मिनिटांत करू शकता. खास गोष्ट अशी आहे की या हेअरस्टाइल बनवण्यासाठी तुम्हाला केसांच्या अ‍ॅक्सेसरीजची जास्त गरज लागणार नाही. या काही टिप्स फॉलो करा आणि स्वतःला एक परफेक्ट प्रोफेशनल लुक द्या.

1. हेअर बँडसह लो पोनी

लो पोनीटेल बनवणे जितके सोपे आहे तितकेच ते केसांसाठी आरामदायक आहे. वास्तविक, जेव्हा आपण उंच पोनीटेल बनवतो तेव्हा पोनीटेल इतके घट्ट होते की केसांच्या (Hair) मुळा दुखू लागतात. यामुळे केस ओढले जातात आणि केसांवर ताण येतो. या प्रकरणात, केसांच्या बँडसह लो पोनीटेल हे लो, सैल पोनीटेल बांधा जेणे करून जे केस खेचले जातात किंवा ताणले जातात ते कमी होईल. यामुळे तुमचे केस सुंदर दिसू शकतात.

2. नीट बन

नीट बन हेअरस्टाईल ही तुमच्या केसांसाठी सर्वात प्रोफेशनल ठरते. नीटनेटका अंबाडा बनवण्यासाठी, तुम्हाला केसांची हेअरस्टाईल करण्यासाठी सर्व केसांना एकत्रीत करून घ्यावी लागेल त्यानंतर नेटच्या साहाय्याने त्यावर लावणे आणि नंतर केसांचा गुच्छा उलट्यासाईडने फिरवून घेणे आणि तुमचा बन तयार होईल.

3. सरळ केसांसाठी हेअरस्टाईल

सरळ केसांसाठी ही हेअरस्टाईल (Hair Style) सर्वात सोपी असू शकते. ही हेअरस्टाईल तयार करण्यासाठी, तुम्हाला फक्त स्ट्रेटनरच्या मदतीने तुमचे केस सरळ करावे लागतात. तुमचे केस सिल्की असल्यास दोन्ही बाजूंनी हेअर पिन लावा. नाहीतर केसांना विंचरा आणि मोकळे सोडा. त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी ही हेअर स्टाईल सर्वात बेस्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT