Ulcers symptoms , Health issue, Stomach pain ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

आतड्याचा अल्सर कसा होतो? जाणून घ्या त्याची लक्षणे

अल्सर म्हणजे काय ? तो कसा होतो ?

कोमल दामुद्रे

मुंबई : बऱ्याचदा आपण अति उष्ण पदार्थ, तेलकट किंवा तिखट खाल्ल्यावर आपल्याला जळजळ होऊ लागते. सतत अॅसिडीटी होणे, पोट दुखणे व उलट्या होणे या सगळीकडे आपण दुर्लक्ष करतो.

हे देखील पहा -

अल्सर हा मुख्यत: पोट आणि आतड्यांच्या आतील भागावरील अॅसिडीटीमुळे होते. यावेळी अॅसिडीटीच्या समस्यामुळे पोटात जखमा तयार होतात. या आजारावर सध्यातरी कोणताही उपचार नाही परंतु, खाण्यापिण्यात पथ्य पाळल्यास आपण त्याला नियंत्रणात आणू शकतो. यावर वेळीच आपण उपचार केल्यास हा आजार गंभीर होऊन जीवही गमवावा लागू शकतो. यामध्ये अधिक प्रमाण हे तरुणाचे आढळून येते. जाणून घेऊया त्याबद्दल

अल्सर म्हणजे काय ?

अल्सर हा पोटातील आतड्यांचा विकार आहे. यामध्ये दोन प्रकार असतात. गॅस्ट्रिक अल्सर आणि ड्यूडिनल अल्सर. या दोन्ही यात लक्षणे वेगवेगळी आहेत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असे वाटते हा आजार मसालेदार पदार्थ किंवा ताणतणावामुळे अल्सर होऊ शकतो पण याचे सर्वात मुख्य कारण आहे धूम्रपान, स्टिरॉइडचा वापर, वारंवार मद्यपान केल्याने अल्सर होण्याचा धोका वाढू शकतो.

लक्षणे -

१. याची सर्वसामान्य लक्षणे ही सतत आळस येणे किंवा पोटात जळजळ होणे ही आहेत. या वेदना आपल्याला काही न खाल्ल्यास जाणवतात. आपल्याला सतत अपचन किंवा छातीत जळजळ होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

२. या आजारांचे (Disease) मुख्य लक्षण आहे रक्तरंजित अतिसार. आपल्या पोटात यामुळे पू देखील होऊ शकतो. तसेच पोटात आग पडणे, भूक न लागणे, थकवा जाणवणे, वजन कमी होणे, ताप, डिहायड्रेशन, सांधेदुखी, तेजस्वी प्रकाशात डोळे (Eye) दुखणे, अशक्तपणा, त्वचेला जखम होणे, मलविसर्जन करताना वेदना होणे आणि रक्तस्त्राव यांसारख्या वेदना होतात.

३. रात्री जेवल्यानंतर आपण सकाळी काहीच खात नाही. यात बऱ्याच वेळेचे अंतर असते. अशावेळी अचानक मळमळ किंवा उलट्या होत असतील किंवा मलविसर्जन करताना त्याचा रंग बदलणे किंवा रक्तस्त्राव होणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

GK: त्सुनामी म्हणजे काय आणि ती इतकी घातक का असते? जाणून घ्या माहिती

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT