World Cancer Day  Saam Tv
लाईफस्टाईल

World Cancer Day : कशी झाली 'कॅन्सर डे' ची सुरुवात, दरवर्षी 4 फेब्रुवारीला का साजरा केला जातो हा दिवस

जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

World Cancer Day : गेली 2 वर्षे संपूर्ण जगासाठी खूप आव्हानात्मक होती. अनेक लोक कोविड महामारीच्या विळख्यात आले, ज्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर वाढते प्रदूषण आणि बदलते वातावरण यामुळे विविध प्रकारचे नवनवीन आजार लोकांना आपला बळी बनवत आहेत.

त्यामुळे वैज्ञानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापैकी एक धोकादायक आजार म्हणजे कर्करोग. जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आज आपण त्याचा इतिहास पाहूयात.

कर्करोग दिन फक्त 4 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो?

जागतिक आरोग्य (Health) संघटनेच्या पुढाकाराने 1933 मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे पहिला कर्करोग दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून, दरवर्षी कर्करोग दिनाला एक नवीन थीम प्रसिद्ध केली जाते.

सर्वसामान्यांना कॅन्सरच्या (Cancer) धोक्यांची जाणीव करून देणे आणि त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबाबत माहिती देणे हा त्यामागचा उद्देश आहे. कर्करोगाबाबत अनेकांचा गैरसमज आहे की तो स्पर्शानेही पसरतो. त्यामुळे लोक कॅन्सरच्या रूग्णांवर चांगले उपचार करत नाहीत. पण तसे अजिबात नाही, उलट ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे.

कर्करोग कसा शोधला गेला -

कॅन्सर या शब्दाची उत्पत्ती ग्रीक वैद्य हिप्पोक्रेट्स (460-370 ईसापूर्व) यांना दिली जाते. त्यांना वैद्यकशास्त्राचे जनक देखील म्हटले जाते. नॉन-अल्सर-फॉर्मिंग आणि अल्सर-फॉर्मिंग ट्यूमरचे वर्णन करण्यासाठी हिप्पोक्रेट्सने कार्सिनो आणि कार्सिनोमा या संज्ञा वापरल्या.

ग्रीकमध्ये हा शब्द खेकड्याला सूचित करतो, शक्यतो रोगाला लागू होतो. 70-80 दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोरच्या जीवाश्मांमध्ये कर्करोगाच्या पेशींचा पुरावा दिसला होता. अनेक संशोधनानंतर 2003 मध्ये हे उघड झाले.

या वर्षाची थीम काय आहे?

दरवर्षी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी एक थीम निश्चित केली जाते. यावेळची थीम क्लोज द केअर गॅप आहे. ही थीम घेऊन हा दिवस जगभरात साजरा केला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा येणार

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT