Silent heart attack warning and symptoms google
लाईफस्टाईल

Silent Heart Attack: थकवा, पाठदुखी की सायलेंट हार्ट अटॅक? दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतू शकतं

Silent Heart Attack Symptoms: शांत हार्ट अटॅकची लक्षणे साध्या वेदनांसारखी वाटतात. अॅसिडिटी, थकवा किंवा पाठदुखीला दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे जीव वाचवू शकते.

Sakshi Sunil Jadhav

  • सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे साध्या आजारांसारखी दिसतात.

  • मधुमेहींमध्ये ही समस्या जास्त आढळते.

  • वेळीच तपासणी न झाल्यास जीव धोक्यात येऊ शकतो.

  • योग्य जीवनशैली आणि तपासण्या हा बचावाचा मार्ग आहे.

महिलांना त्यांच्या साठीत शरीरात अनेक बदल जाणवायला लागतात. त्यामध्ये हदयाचे ठोके चुकल्यासारखे वाटणे हे एक लक्षण त्यांना जाणवत असते. त्यावेळेस महिलांमध्ये उच्च रक्तदाब, जास्त वजन, उच्च कोलेस्ट्रोल आणि डायबिटीज असते. या सामान्य वाटणाऱ्या तक्रारींचा आपल्या शरीरावर खूप गंभीर परिणाम होत असतो. हे लक्षण सायलेंट हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.

हार्ट अटॅक आला की छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवतात हे सगळ्यांना माहीत असते. मात्र, काहीवेळा हाटर्ट अटॅक कोणत्याही ठळक लक्षणांशिवाय येतो. यालाच वैद्यकीय भाषेत Silent Heart Attack असे म्हणतात. अशा प्रकारचा झटका लोकांना सामान्य दुखणी किंवा अॅसिडिटीसारख्या समस्येतून झाल्याचे वाटते आणि योग्य वेळी उपचार मिळत नाहीत.

हैदराबाद येथील ५९ वर्षीय महिलेच्या तपासणीत अशीच घटना समोर आली होती. ती महिला शिंगल्सच्या फॉलोअपसाठी डॉक्टरांकडे आली होती. साध्या गप्पांमध्ये तिने सांगितले की तिला कधी कधी हृदयाचे ठोके चुकल्यासारखे वाटते. डॉक्टरांनी महिलेची तातडीने तपासणी केली. तिच्या ईसीजी चाचणीत आधीच हार्ट अटॅक आल्याचे स्पष्ट झाले. आश्चर्याची बाब म्हणजे तिला या अटॅकदरम्यान छाती वेदना जाणवल्याच नव्हत्या.

तज्ज्ञांच्या मते Silent Heart Attackची लक्षणे नेहमीच्या दैनंदिन समस्यांसारखी असतात. उदा. अॅसिडिटी, सांधे दुखी, थकवा किंवा पोटात जडपणा. भारतासारख्या देशात लोक अशा वेदना औषधं घेऊन दाबतात आणि खरा आजार जास्त गंभीर होतो. या प्रकाराला referred pain असे म्हटले जाते. कारण हृदयातील वेदना पोट, पाठ किंवा खांद्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे खरी समस्या लक्षातच येत नाही.

विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ही समस्या अधिक गंभीर ठरते. त्यांच्या नसा सुन्न झालेल्या असल्यामुळे त्यांना नेहमीसारखा छातीचा त्रास जाणवत नाही. त्याऐवजी फक्त थोडीशी पोटफुगी, अपचन किंवा पाठीचे dull pain अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांकडे जाणेच सर्वात महत्त्वाचे ठरते. जर या छोट्या तक्रारींसोबत घाम, श्वास घ्यायला त्रास, चक्कर अशी लक्षणे जाणवली तर ती साधी वेदना नाही, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

भाजप नेत्याचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात, डोक्यात गोळी लागली अन् बाजूला पिस्तूल; नेमकं काय घडलं?

Video : तिरुपती मंदिरात १०० कोटींच्या चोरी प्रकरणात खळबळजनक खुलासा, CCTV फुटेजमध्ये चोरी करताना दिसला अधिकारी

IND vs PAK: भारतविरुद्ध पाकिस्तान हायव्होटेज सामन्याचा पुन्हा थरार रंगणार; कुठे फ्रीमध्ये पाहाल सामना?

Maharashtra Politics: शिवतीर्थावर ठाकरे-राणेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण, दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?VIDEO

SCROLL FOR NEXT