How to clean Tea strainer, kitchen hacks, kitchen tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

गृहिणींनो,चहाची गाळणी काळी पडतेय तर या टिप्स फॉलो करा

या पध्दतीने चहाची गाळणी साफ करा.

कोमल दामुद्रे

मुंबई : चहा पिण्यासाठी कोणतीही वेळ नसते. आपल्याला हव्या त्यावेळेस आपण चहा पिऊ शकतो. चहा हे फक्त पेय नाही तर अनेकांना ऊर्जा त्यातून मिळत असते.

हे देखील पहा -

सतत चहा गाळल्याने चहाची गाळणी काळी पडू लागते अशावेळी तिला कितीही घासले तरी तिचा काळपटपणा निघत नाही. चहा गाळल्यानंतर उर्वरित चहाचा चोथा त्यात अडकून राहतो. त्यामुळे ती फेकून देतो परंतु, ही ट्रिक वापरल्यानंतर चहाची गाळणी आपण चमकवू शकतो. आपल्या स्वयंपाकघरात काही असे पदार्थ आहेत ज्यामुळे आपण ती चांगल्याप्रकारे साफ करु शकतो. चहा प्रत्येक घरात (Home) बनवला जातो आणि प्रत्येक पदार्थासोबत त्याचा आस्वाद घेतला जातो. पण चहाच्या गाळणीला कसे स्वच्छ करायचे हे जाणून घेऊया.

वारंवार चहा गाळल्यामुळे चहा गाळणीत घाण साचते व चहा ची चव देखील बदलते. चव बदल्यामुळे आपल्याला चहा पिण्याची इच्छा होत नाही. स्वयंपाकघरातील एकही वस्तू फेकून द्यायचे म्हटले की, गृहिणींच्या जीवावर येते. चहाची गाळणी फेकण्याऐवजी तिला या पध्दतीने साफ केली तर ती स्वच्छ निघण्यास मदत होईल.

१. आपली चाळणी जर स्टीलची असेल तर त्याला गॅसवर (Gas) ठेवा. गरम झाल्यानंतर चाळणीत घाण असेल तर ती निघून जाईल. नंतर त्यावर लिंबू चोळा व त्यावर टूथब्रशने घासा असे वारंवार केल्याने ती पुन्हा नव्यासारखी दिसेल

२. प्लास्टिकच्या गाळणीला साफ करताना तिला चांगले घासून घ्या. गरम पाण्यात लिंबाचा रस घालून गाळणीला त्यात काही मिनिटे ठेवा. ती काही मिनिटात साफ होईल.

३. लिंबूत थोडा थोडासा बेकिंग सोडा मिसळूनही आपण गाळणी साफ करु शकतो. ही ट्रीक स्टील आणि प्लास्टिकच्या दोन्ही गाळण्यांवर काम करेल. ही चाळणी स्वच्छ करुन आपण पुन्हा वापरू शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या विसर्गात आणखी मोठी वाढ

Ladki Bahin Yojana: १२ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून 'लाडकी'चा लाभ, शिस्तभंगाची कारवाई होणार|VIDEO

India-Pakistan Cricket: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही? क्रीडा मंत्रालयानं स्पष्टचं सांगितलं

Voter Duplication: सत्ताधारी आमदाराच्या पत्नीचं मतदार यादीत दोनदा नाव|VIDEO

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?

SCROLL FOR NEXT