Hormonals Issue Saam Tv
लाईफस्टाईल

Hormonals Issue : महिलांनो, लैगिंक संबंध ठेवताना पुरुषांमध्ये दिसते का? हार्मोन्सची कमतरता; 'ही' आहेत त्याची लक्षणे

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी व जोडीदाराला खुश बघण्यासाठी तो हवे तसे प्रयत्न करतो.

कोमल दामुद्रे

Hormonals Issue : हल्ली प्रत्येक नात्याला जोडून ठेवणारा दुवा हे त्या व्यक्ती बद्दल असणारे प्रेम असते. लैगिंक क्रिया ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. तिला सुखकर करण्यासाठी तो अनेक प्रयत्न करत असतो.

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी व जोडीदाराला (Partner) खुश बघण्यासाठी तो हवे तसे प्रयत्न करतो. पंरतु, या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हा त्या नात्यात पुरेसा नसतो. आपले आपल्या जोडीदारावर प्रेम आहे व ते व्यक्त करण्यासाठी शरीर संबंध ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी शरीर व मन एकत्र येणे हा देखील त्या नात्याचा महत्त्वाचा भाग आहे.

बघायला गेले तर, काही अंशी पुरुष किंवा महिला आपल्या जोडीदाराच्या शरीर संबंधावरुन नाराज असतात. या गोष्टी हव्या त्या पध्दतीने सुख न मिळाल्यास त्यांची अधिक चिडचिड होते. ही हार्मोन्सची समस्या पुरुषांमध्ये अधिकरित्या पाहायला मिळते.

पुरुषांमध्ये (Mens) सेक्स हार्मोन्सच्या कमतरता कोणत्या आहेत ? असे अनेक प्रश्न आहेत जे अनेकांना जाणून घ्यायचे आहेत. काही पुरुषांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, पुरुषांचे वय जसजसे वाढत जाते तसतसे त्यांच्यातील लैगिंक संबंधाचे हार्मोन्स टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते. जेव्हा या हार्मोन्स टेस्टोस्टेरॉनची पातळी शरीरातून कमी होते, तेव्हा त्याच्याशी संबंधित लक्षणे देखील दिसू लागतात. ज्याबद्दल पुरुषांना स्वतःला माहित नव्हते. टेस्टोस्टेरॉन म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती आहेत, हे जाणून घेऊया

टेस्टोस्टेरॉन म्हणजे काय ?

सेक्स हार्मोन्सला टेस्टोस्टेरॉन म्हणतात. हा हार्मोन्स पुरुषांच्या शरीरात तयार होतो. या संप्रेरकामुळे पुरुषांमध्ये लैगिंक संबंधाचे ड्राइव्ह वाढते आणि कमी होते. पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन कमी होऊ लागल्यास त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. त्याची लक्षणे शरीरात दिसू लागली तर त्यावर योग्य वेळी उपचार होऊ शकतात.

हार्मोन्स कमी होण्याची लक्षणे कोणती ?

१. वारंवार मूड बदलणे -

जेव्हा पुरुषांचा मूड वारंवार बदलू लागतो; तेव्हा समजून घ्या की, शरीरात लैगिंक संबंधाचे हार्मोन्स कमी होत आहेत. या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे ते भावनिकदृष्ट्याही खूप बदलतात. शरीरातून निर्माण होणारे कमी लैगिंक हार्मोन्सचे अनेक तोटे आहेत जसे की तणाव, चिंता, नैराश्य, चिडचिड आणि अस्वस्थता इत्यादी. जर ही लक्षणे तुमच्यात येऊ लागली तर समजून घ्या की लैगिंक हार्मोन्स कमी होत आहेत.

२. अशक्तपणा येणे -

जेव्हा पुरुषांना अशक्तपणा जाणवतो, याचा अर्थ असा होतो की त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची कमतरता आहे. अशा परिस्थितीत पुरुषांच्या स्नायूंवर खूप वाईट परिणाम होतो. आणि ती खूप अशक्त होऊ लागते.

३. लैगिंक संबंध करताना कंटाळा येणे -

जेव्हा पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स कमी होऊ लागतो, तेव्हा त्यांना सेक्स करावेसे वाटत नाही. जर पुरुष लैंगिक संबंधांपासून अंतर ठेवत असेल तर समजले पाहिजे की, शरीरात सेक्स हार्मोन्सची कमतरता आहे.

४. खूप टेन्शन घेणे -

जेव्हा पुरुषांच्या शरीरात सेक्स हार्मोन्सची कमतरता असते, तेव्हा ते अधिक टेन्शन घेऊ लागतात. या तणावामुळे ते लैगिंक संबंध ठेवण्यापासून दूर पळू लागतात किंवा योग्य प्रकारे सेक्स करू शकत नाहीत.

५. विस्मृती होणे -

पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची कमतरता असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होतो. जिथे त्यांना काहीच आठवत नाही. कमकुवत स्मरणशक्तीमुळे त्यांची प्रकृतीही बिघडू लागते. जसजसे त्याचे वय वाढते तसतसे त्यांच्या सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. ही लक्षणे ओळखून, आपण त्याच्या उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Cylinder: मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर, LPG बाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

चुकून दुसऱ्याची चप्पल घातल्याने रक्तरंजित थरार; डोक्यात विटा घालून एकाला संपवलं, नागरपूर हादरलं

Shocking : हृदयद्रावक! मध्यरात्री घरावर बॉम्ब हल्ला, आईच्या कुशीत झोपलेल्या २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त, प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची घसरण, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT