भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Honda टू व्हीलर्स एक नवीन मोटारसायकल लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे, जी 160cc ते 180cc या विभागात येण्याची शक्यता आहे. हे बजाजच्या पल्सर मॉडेलला आव्हान देईल.
ही मोटारसायकल 2 ऑगस्ट रोजी बाजारात (Market) आणण्याची तयारी आहे. जपानी टू-व्हीलर ब्रँडने आधीच सोशल मीडिया पोस्टद्वारे मोटरसायकलची छटा सादर केली आहे आणि त्यातील काही तपशील उघड केले आहेत.
2 ऑगस्ट रोजी लॉन्च होणाऱ्या आगामी Honda मोटारसायकलमध्ये जोरदार मस्क्यूलर फ्युएल टँक आणि फ्युएल टँक एक्सटेन्शन्स असतील, जे मॉडेलला अधिक स्पोर्टी बनवेल, हे त्याच्या टीझरवरून दिसून येते.
LED टेललाइट हे सुनिश्चित करते की बाइक प्रीमियम फीलसह येईल. तसेच एक शार्प एलईडी हेडलॅम्प मिळणे अपेक्षित आहे. मोटारसायकल (Motorcycle) स्प्लिट सीट सेटअपसह येण्याची अपेक्षा आहे. 162cc सिंगल-सिलेंडर एअर कूल्ड मोटर हे Honda Unicorn वर आधारित असण्याची अपेक्षा आहे, ब्रँडच्या यशस्वी उत्पादनांपैकी एक आहे तरी मोटरसायकलला उर्जा देणारे इंजिन होंडा युनिकॉर्नसारखेच असेल.
तथापि, 162cc सिंगल-सिलेंडर एअर कूल्ड मोटर वेगळ्या पद्धतीने ट्यून केली जाईल. युनिकॉर्नपेक्षा किंचित जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करणे अपेक्षित आहे. लॉन्च (Launch) झाल्यावर, नवीन Honda मोटरसायकल बजाज पल्सर 150, Yamaha FZ-5 आणि TVS Apache RTR 160 सारख्या मोटारसायकलला टक्कर देईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.