New Honda Two-Wheeler Teased : देशातील दुचाकी बाजारात बाइकला सर्वाधिक मागणी आहे, पण होंडाची अॅक्टिव्हा बाइकपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. आता Honda Motorcycle & Scooter नवीन स्कूटर आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकताच स्कूटरसारखा दिसणारा टीझर रिलीज केला आहे. टीझरवरून असे दिसते की ही एक स्पोर्टी स्कूटर आहे ज्यामध्ये उत्कृष्ट व्हिज्युअल ग्राफिक्स आहेत.
त्याची रचना Honda Dio सारखी दिसते. अशा स्थितीत ते डिओ 125 (होंडा डिओ 125) असू शकते, असे मानले जात आहे. टीझर म्हणतो, "तुम्ही आणखीन स्टाईलीश व्हा" आणि एक्झॉस्ट नोट खूपच स्पोर्टी वाटते. ही स्कूटर याच महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.
स्कूटरला (Scooter) पूर्णपणे नवा लूक देण्यात आला असून त्याची एक्झॉस्ट नोट स्पोर्ट्स बाईकसारखी आहे. यावर उत्कृष्ट व्हिज्युअल ग्राफिक्स देण्यात आले आहेत. आता चर्चा आहे की या महिन्यात होंडा ही स्कूटर बाजारात आणू शकते. कंपनी डिओचे दोन प्रकार बाजारात आणू शकते. यामध्ये Dio 125 आणि Dio 110 चा समावेश आहे. दोघांना भिन्न इंजिन कॉन्फिगरेशन मिळतील. यामध्ये फक्त Honda Activa 125 आणि 110 चे इंजिन घेता येईल. Dio 125 मध्ये कंपनी जे इंजिन वापरणार आहे ते एअर कूल्ड 123.9 cc असेल आणि ते 8.18 bhp पॉवर जनरेट करेल.
अनेक वेगळे फीचर्स
स्कूटरला सायलेंट स्टार्टर सिस्टीमसह इंजिन ऑटो स्टार्ट स्टॉपचे फीचर्स (Features) दिले जाईल. यासोबतच स्मार्ट कीसह एच स्मार्ट सिस्टीमही यात असेल. साइड स्टँड कट ऑफ, स्मार्ट एलईडी आणि पास स्विचने सुसज्ज असेल. यात डिजिटल डिस्प्ले असेल. तसेच, अॅपद्वारे तुम्ही ते मोबाईलशी कनेक्ट करू शकाल. स्कूटरमध्ये यूएसबी चार्जिंगची सुविधाही तुम्हाला मिळेल.
नवीन 350cc बाईक
350 सीसीच्या पूर्णपणे नवीन डिझाइनमध्ये सादर केले जाईल. असे मानले जात आहे की त्याच्या स्पोर्ट्स डिझाइनशिवाय होंडा आता रोडस्टर बाजारात (Market) आणेल. इंजिन CB350 सारखेच असले तरी ते टूरिंगसाठी डिझाइन केलेले असेल.
मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही आणि लॉन्चबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. ही बाईक क्रूझर असण्याचेही संकेत मिळत आहेत. त्याची थेट स्पर्धा रॉयल एनफिल्ड आणि येझदीच्या मोटारसायकलींशी असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.