Homemade Kalakand recipe saam tv
लाईफस्टाईल

Homemade Kalakand recipe : तोंडाच टाकताच लगेल विरघळेल, दिवाळीला घरच्या घरी १० मिनिटांत बनवा कलाकंद!

Homemade Kalakand recipe: 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबिजेपर्यंत 5 दिवस चालतो. या दिवशीही तुम्हीही घरी गोड पदार्थ बनवणार असाल तर हा कलाकंद बनवा.

Surabhi Jagdish

दिवाळीला सुरुवात झाली असून या दिवसांमध्ये मिठाईची घराघरात रेचलेच असते. मात्र यावेळी फराळाचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आम्ही तु्म्हाला एक उत्तम मिठाईची रेसिपी सांगणार आहोत. 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबिजेपर्यंत 5 दिवस चालतो. यानिमित्ताने बाजारातून मिठाई खरेदी करून खाऊ घातल्याने नात्यात गोडवा येतो.

मिठाईचे सेवन आरोग्यासाठी घातक असलं तरी दिवाळीच्या विशेष प्रसंगी लोक मिठाई भरपूर प्रमाणात खातात. सध्या दिवाळीच्या दिवसात मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. त्यामुळे बाजारातून मिठाई आणण्याऐवजी यंदाच्या दिवाळीत मिठाई घरी बनवा. चला आज आपण घरच्या घरी कलाकंद कसा करायचा ते पाहूयात.

घरी कसा बनवू शकतो कलाकंद

कलाकंद बनवण्यासाठी तुम्हाला 250 ग्रॅम पनीर, 2.5 लिटर दूध, अर्धा किलो साखर, अर्धा ग्लास पाणी, काजू-बदाम, पिस्ता आणि एक चमचा वेलची पावडर लागणार आहे.

घरच्या घरी करा कलाकंद

  • मावा तयार करण्यासाठी एका भांड्यात दूध घाला. यानंतर पनीर हाताने कुस्करून घाला (cooking tips) आणि चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. यावेळी गॅस मंद आचेवर ठेवा. जेव्हा दुधाची पेस्ट घट्ट होऊ लागते किंवा घट्ट आकार घेऊ लागते तेव्हा समजून घ्या की मावा तयार झाला.

  • आता ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून घ्या. यावेळी एका कढईत तूप घालून त्यात तळून घ्या.

  • पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात अर्धा कप पाणी घाला आणि त्यात साखर घाला. हे थोडसं कॅरेमल तयार होईपर्यंत शिजवा. पिवळा कलाकंद तयार करायचा असेल तर त्यात केशर टाकू शकता.

  • आता पॅनमध्ये असलेल्या सिरपमध्ये मावा घाला आणि मंद आचेवर घट्ट होईपर्यंत परता. यावेळी वेलची पूड घाला.

  • तयार केलेलं बॅटर एका प्लेटमध्ये काढून पसरवा. थोडं थंड झाल्यावर त्याला आकार द्या आणि चाकूने हव्या त्या आकारात कापून घ्या. अशा प्रकारे तुमचा कलाकंद तयार आहे. त्यावर पिस्त्याचा काप लावू सर्व्ह करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Sports: भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

VIDEO : अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या विधानावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: अमित ठाकरेंना महायुतीतील भाजपचा पाठिंबा मग शिवसेनेने का दिला उमेदवार? फडणवीसांनी सांगितली राजकीय खेळी

नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता? नाव ऐकून तुम्हालाही होईल आनंद

Diwali Festival: दिवाळीचा फराळ महिनाभर फ्रेश ठेवण्यासाठी 'या' खास टिप्स फॅालो करा

SCROLL FOR NEXT