Chirote Recipe  Saam TV
लाईफस्टाईल

Chirote Recipe : नाजूक पाकळ्या आणि खुसखुशीत चिरोटे; कमी साहित्यात घरच्याघरी बनवा रेसिपी

Homemade Chirote Recipe : घरच्याघरी चिरोटे कसे बनवायचे. वाचा सोपी आणि सिंपल रेसिपी.

Ruchika Jadhav

राज्यात सणउत्सवांना सुरुवात झाली आहे. या महिन्यात घरोघरी घट बसणार आहेत. तर पुढील महिन्यात लगेचच दिवाळी सुरुवात होईल. सणसमारंभ म्हटलं की घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आपण एक खास आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या गोड पदार्थाची रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी इतकी सोपी आहे की कोणत्याही व्यक्तीला अगदी सहज बनवता येते.

दिवाळी किंवा घटस्थापनेला देवीला विविध गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे आज आपण घरच्याघरी पातळ लेअर असलेले चिरोटे कसे बनवायचे याची माहिती जाणून घेणार आहोत. चिरोट्यांना नाजूक पाकळ्या असतात. अनेकांना घरी या पाकळ्या व्यवस्थित बनवता येत नाहीत. त्यामुळे आज याचे परफेक्ट माप आणि रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

मैदा - ४ वाटी

वनस्पती तूप - १ वाटी

साखर - ३ वाटी

पाणी - १ वाटी

वेलची - ४

जायफळ - पाव चमचा

तेल - तळण्यासाठी

कृती

सर्वात आधी आपल्याला चिरोटे बनवण्यासाठी कणीक मळून घ्यावी लागेल. त्यासाठी मैदा घ्या. त्यानंतर वनस्पती तूप थोडं गरम करून घ्या. गरम वनस्पती तुपाचे मोहन मैद्यात ओतून घ्या. तूप गरम असल्याने एखाद्या चमचाच्या सहाय्याने संपूर्ण पिठात मस्त मिक्स करून घ्या. त्यानंतर पिठ थोडं नॉर्मल टेंर्पेचरला आलं की त्यात पाणी मिक्स करून कणीक मळून घ्या. तयार कणीक आर्धात तास एका सुती कपड्याखाली झाकून ठेवा.

त्यानंतर पुन्हा एका वाटीत मैदा घ्या. १ वाटी मैद्यामध्ये पाव वाटी तूप मिक्स करा. आता यावेळी तूप थंड असतानाच मिक्स करून घ्या. पिठ आणि तूप यांची छान पेस्ट तयार होईल या पद्धतीने मिश्रण छान फेटून घ्या. तयार मिश्रण आपल्याला चिरोटी खुसखुशीत बनवण्यासाठी महत्वाचे आहे.

त्यानंतर मळलेली कणीक घ्या. या कणीकचे छोटे छोटे गोळे तयार करा. त्यानंतर यातील प्रत्येक गोळ्याची मध्यम आकारात पोळी लाटून घ्या. पोळी लाटून झाली की ती बाजूला ठेवा. एक एक करून चार पोळ्यांना पीठ आणि तुपाची पेस्ट लावून घ्य. त्यानंतर या सर्व पोळ्या एकावर एक ठेवा. पुढे या पोळ्यांचा बारीक रोल तयार करा. रोल तयार झाल की सुरीच्या सहाय्याने त्याचे बारीक काप करून घ्या. त्यानंतर हे तळून घ्या. तसेच पाकात टाकून ठेवा. अशा पद्धतीने तयार झाले झटपट चिरोटे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT