Holi 2024, Home Remedy For Bhang Hangover
Holi 2024, Home Remedy For Bhang Hangover Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2024 : भांगचा हँगओव्हर कसा उतरवाल? हे घरगुती उपाय करुन पाहा

कोमल दामुद्रे

How To Get Relief Bhang Hangover :

होळी हा रंगांचा उत्सव. या दिवशी रंग खेळण्यासोबत भांगचे सेवन केले जाते. परंतु, हे प्यायल्यानंतर शरीरावर आपले नियंत्रण राहात नाही. दुसऱ्या दिवशी याचा हँगओव्हर उतरवणं फार अवघड जाते.

अनेकजण भांग, थंडाई आणि गुजियासारखे पदार्थांसोबत होळीचा सण साजरा करतात. परंतु, नंतर होणारा हँगओव्हर आपल्याला अधिक त्रासदायक ठरतो. याचे सेवन केल्याने डिहायड्रेशनची समस्या, मळमळ, डोकेदुखी (Headache) आणि चक्कर येण्याच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हीही भांग प्यायले असाल तर हँगओव्हर उतरवण्यासाठी या टिप्स (Tips) लक्षात ठेवा.

1. भरपूर पाणी प्या

शरीरात पाण्याची कमी झाल्यावर भांगचा हँगओव्हर हा अधिक काळ राहातो. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी (Water) प्या. तसेच नारळ पाणी, फळांचा रस पिणे अधिक चांगले ठरु शकते. हायड्रेट राहिल्याने हँगओव्हरचा प्रभाव कमी होतो.

2. तळलेले अन्नपदार्थ

रिकाम्या पोटी भांग प्यायल्याने त्याचा प्रभाव अधिक काळ राहातो. भांग पिण्यापूर्वी काही तरी खा, ज्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहिल. तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाल्ल्याने हँगओव्हर अधिकवेळ राहतो. त्याऐवजी फळे, ओट्स, सलाद, कडधान्ये यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा.

3. विश्रांती घ्या

हँगओव्हरमुळे डोकेदुखी आणि मळमळ सारख्या समस्या उद्भवतात. अशावेळी अनेकजण औषधे घेतात ज्यामुळे त्यांना आराम तर मिळतो. यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या त्यामुळे आराम मिळेल.

4. लिंबू पाणी

हँगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करु शकता. लिंबू पाण्यामुळे मळमळ कमी होते. तसेच डिहायड्रेशनच्या समस्येपासून आराम मिळतो.

5. कॉफी पिऊ नका

हँगओव्हरच्या डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी किंवा फ्रेश वाटण्यासाठी कॉफी पितात. परंतु, यामुळे शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे हँगओव्हर आणखी वाढू शकतो. त्याऐवजी तुम्ही हर्बल टी पिऊ शकतो. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात.ज्यामुळे डोकेदुखी दूर होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bengaluru Video : खुल्लम खुल्ला प्यार! धावत्या दुचाकीवर गर्लफ्रेंडला मिठीत घेत तरुणाचा प्रवास, VIDEO व्हायरल

Beed News : तुरीच्या बियाण्यातून फसवणूक; ३ वर्ष लढला व जिंकलाही, कोर्टाने दिले भरपाईचे आदेश

Aaditya Thackeray: मतदान केंद्राबाहेर असुविधा, अनेक तक्रारी; आदित्य ठाकरेंची X अकाउंटवर पोस्ट करत निवडणूक आयोगाला विनंती

Maharashtra Election: मुंबईसह राज्यात संथगतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी; देवेंद्र फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

Health Tips: स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासायी 'या' सवयी पाळा

SCROLL FOR NEXT