Holi 2024 : होळीचे रंग आणि पाण्यापासून मोबाईलचे संरक्षण कसे करावे? फॉलो करा 'या' टिप्स

Holi Mobile Safety : होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी मागच्या सगळ्या चुका विसरून पुन्हा नव्याची सुरवात करतो. होळीला लोक रंगांची उधळण करत जबरदस्त मजा करतात. काही लोक होळीच्या सणात इतके मग्न होतात.
Holi 2024
Holi 2024Saam Tv

Holi Celebration :

हिंदु संस्कृतीत अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्रात अनेक सण उत्सव अगदी मोठ्या जल्लोषात साजरी केले जातात. सण उत्सवा साजरे करणाच्या मागे काही ना काही शास्त्रीय आणि धार्मिक कारण नक्कीच असते. आज २४ मार्च २०२३ होळी हा सण सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.

होळी हा रंगांचा सण आहे. या सणाचा आनंद घ्यायचा असेल तर तो घराबाहेर पडावेच लागते. या दिवशी रंगाने आणि पाण्याने होळी खेळली जाते. या दिवशीचे क्षण प्रत्यक्षात टिपण्यासाठी फोन आणि कॅमेरे वापरले जाते. अशा परिस्थितीत, होळीच्या दिवशी स्मार्टफोनमधून फोटो क्लिक करताना तुमच्या फोनला रंग लागला तर....

होळी हा रंगाची उधळण करणारा सण आहे. तसेच या सणाच्या दिवशी मागील सर्व काही सुख-दुख विसरून सारेचजण गुण्यागोविंदाने हा सण साजरा करतात. होळीला लोक रंगांची उधळण करत जबरदस्त मजा करतात. काही लोक होळीच्या सणात इतके मग्न होतात. होळीच्या दिवशी रंग, अबीर आणि भांग यांच्या गमतीजमतीत लोक मोबाईलची काळजी (Care) घ्यायला विसरतात.फोनवर पाणी आणि रंग लागल्याने फोन खराब होण्याची शक्यता असते अशावेळी फोनची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊया.

होळीच्या दिवशी फोनचे पाणी आणि रंगापासून संरक्षण कसे करावे?

होळीच्या दिवशी रंग किंवा पाण्याने सण साजरा करतात. त्यामुळे होळीच्या दिवशी तुमचा मौल्यवान फोन बाजारात उपलब्ध असलेल्या वॉटरप्रूफ कव्हरमध्ये ठेवा.

Holi 2024
Holi Celebration : रंगिबेरंगी रंगांनी सजली बाजारपेठ; महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्साहात होळी साजरी

तुमचे हात रंग आणि पाण्याने ओले झाले आहेत. अशा वेळी अनेक वेळा फोटो काढताना किंवा बोलत असताना फोनचा (Phone) वापर होतो. यासाठी हात कोरडे केल्यानंतर फोन वापरा.

फोन घेऊन जाताना होळी खेळायची असेल तर त्यासाठी वॉटरप्रूफ पाउच किंवा बॅग वापरा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पॉलीथीनमध्येही फोन बॅगमध्ये ठेवू शकता.

जर तुम्ही रंग आणि पाण्याने पूर्णपणे भिजलेले असाल. तुमचे डोके ओले असेल तर फोन कानाला लावून बोलू नका. स्पीकरवर बोलणे चांगले होईल. अन्यथा डोक्यातून पाणी तुमच्या फोनमध्ये जाऊ शकते.

Holi 2024
Holi Celebration | भांगचे पदार्थ किंवा थंडाई पिण्याचा प्लान करताय? या गोष्टी लक्षात घ्या

होळीच्या दिवशी बोलण्यासाठी इअरफोन किंवा ब्लूटूथ वापरा. हे मोबाईल फोन घसरण्यापासून किंवा ओले होण्यापासून आणि रंगाचे संरक्षण करेल.

फोनमध्ये पाणी आल्यास कोणाला फोन करू नका किंवा कोणाचा फोन उचलू नका. यामुळे फोनमध्ये स्पार्किंग होऊ शकते. ताबडतोब फोन बंद करा आणि बॅटरी काढा आणि कोरड्या कापडाने पुसून टाका.

Holi 2024
Holi Celebration | भांगचा हँगओव्हर कसे उतरवाल? वाचा सविस्तर

एक घरगुती उपाय केला जाऊ शकतो तो म्हणजे फोन ओला झाल्यावर पुसून घ्या आणि नंतर तांदळाच्या डब्यात ठेवा. सुमारे 12 तासांनंतर, फोन काढा आणि तो चालू करा. यामुळे फोनमधील आर्द्रता सुकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com