How to Whiten Teeth Naturally Know in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Teeth Whitening Tips: दातांचा पिवळेपणा काही केल्या जात नाही? हे घरगुती उपाय करुन पाहा, मोत्यासारखे चमकतील

Home Remedies To Whiten Teeth Know in Marathi: जर तुम्हालाही दातांना मोत्यासारखे चमकव्याचे असतील तर काही घरगुती उपाय करुन तुम्ही त्यांना पांढरे शुभ्र करु शकता. जाणून घेऊया त्याबद्दल.

कोमल दामुद्रे

आपले दात पिवळे असतील तर आपल्याला सगळ्यांसमोर हसून बोलायला जमत नाही. त्यामुळे याचा बराच विचार करावा लागतो. दात साफ करण्यासाठी कितीही महागड्या टूथपेस्टचा वापर केला तरी दात हे पिवळेच दिसू लागतात.

डॉक्टरांच्या मते किमान दिवसातून दोन वेळा तरी ब्रश करायला हवा. दात सतत पिवळे पडण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील एक कॅल्शियमची कमतरता किंवा यकृताच्या समस्येमुळे दात पिवळे पडतात. याशिवाय धुम्रपान, तंबाखू, कोल्ड्रिंक्स सोडा, चहा, कॉफी यांचे अतिसेवन केल्यानेही दात पिवळे पडतात.

जर तुम्हालाही दातांना मोत्यासारखे चमकव्याचे असतील तर काही घरगुती उपाय (Home Remedies) करुन तुम्ही त्यांना पांढरे शुभ्र करु शकता. जाणून घेऊया त्याबद्दल

1. लिंबू, मीठ आणि बेकिंग सोडा

एक चमचा बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि थोडे मीठ मिसळा आणि टूथब्रशच्या मदतीने दातांवर घासा. पाच मिनिटांनी थंड पाण्याने (Water) दात स्वच्छ करा. यामुळे दात चमकण्यास मदत होईल.

2. नारळाचे तेल

खोबऱ्याच्या तेलाने (Coconut Oil) दातांना मसाज करा. नंतर काही वेळ तसेच राहू द्या. थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. नारळाच्या तेलामध्ये असणारे घटक प्लक मध्ये निर्माण झालेले बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.

3. संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीचा पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ब्रशच्या मदतीने दात घासा. असे नियमित केल्याने दात स्वच्छ होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT