White Hair Remedies
White Hair Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Home Remedies For White Hair: अकाली पिकलेल्या केसांना काळे, घनदाट करायचे आहे ? मग तेलात मिसळा हा पदार्थ, पुन्हा कधीच होणार नाहीत पांढरे

कोमल दामुद्रे

Hair Falls Problem : केसगळती, केसांची वाढ न होणे व अकाली केस पिकणे यामुळे हल्लीचा तरुणवर्ग त्रस्त आहे. वय वाढण्याआधीच एकत्र केसगळती सुरु होते किंवा केस अकाली पांढरे पडू लागतात. असे का होते हे जाणून घेऊया

खराब जीवनशैली, केसांची (Hair) योग्यप्रकारे निगा न राखणे, टेन्शन, झोपेची कमतरता व पुरेशा प्रमाणात पोषक तत्वांचे सेवन न केल्यामुळे या समस्या उद्भवतात. एक्सरसाइजची कमतरता व सतत केसांसाठी केमिकल्सच्या पदार्थांचा वापर केल्यामुळे केसगळती व केस पांढरे होतात. अशावेळी कोणते तेल (Oil) केसांना लावायला हवे. केसांमध्ये कोणते पदार्थ घालायला हवे हे जाणून घेऊ.

1. राईचे तेल ठरेल फायदेशीर

पांढऱ्या होणाऱ्या केसांसाठी राईचे तेल फायदेशीर ठरेल. याचा वापर केल्यास डँड्रफ, ड्राय स्कॅल्पला पोषण देते तसेच यात असणारे अँटी-ऑक्सीडेंट्स केसांना अधिक पोषक तत्व देतात ज्यामुळे अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टीरियलमुळे केसांचे अकाली पिकणे कमी होते.

2. मेथीचे दाणे (Fenugreek seeds) व राईचे तेल

  • ३ चमचे राईच्या तेलात एक चमचा नारळाचे तेल मिक्स करा

  • नंतर त्यात मेथीचे दाणे व कढीपत्ता घालून आठवडाभर तसेच ठेवा. आठवड्याभरानंतर तेलाला गरम करा व कोमट झाल्यानंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा.

  • एक दिवसाआड असे १० दिवस केसांना चांगल्याप्रकारे लावा. तेल लावल्यानंतर १ ते २ तासानंतर केस लगेच धुवा. असे केल्याने अकाली पिकलेले केस काळे होण्यास मदत होईल.

3. राईचे तेल व कलोंजी

एका भांड्यात राईचे तेल गरम करून त्यात कलोंजी घाला. तेल गरम करुन केसांना लावून हलक्या हाताने मसाज करा. असे आठवड्यातून दोनदा केल्याने केस काळे होण्यास मदत होईल.

4. राईचे तेल आणि आवळा

आवळा व्हिटॅमिन सी युक्त परिपूर्ण आहे. एका भांड्यात राईचे तेल घ्या, त्यात आवळा घाला आणि गरम करा. तेल गरम करुन केसांना लावून हलक्या हाताने मसाज करा. असे आठवड्यातून दोनदा केल्याने केस काळे होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Election Scam | माढ्यात नकली नोटांचा पाऊस! उत्तम जानकरांचा आरोप काय?

IPL 2024 DC vs RR: घरच्या मैदानात दिल्लीची फटकेबाजी; राजस्थानसमोर २२२ धावांचे आव्हान

Special Report : किरण सामंत नॉट रिचेबल! राणेंचं टेंशन वाढवणार?

Special Report | बारामतीत सुप्रिया सुळेंची गांधीगिरी! सुळेंनी गाठलं थेट अजितदादांचं घर

Special Report : मेरे पास माॅं है! अजित पवार सख्या भावाला असं का बोलले?

SCROLL FOR NEXT