Home Loan EMI  Saam Tv
लाईफस्टाईल

Home Loan चे किती EMI न भरल्यास बँक करते कारवाई? जाणून घ्या

Home Loan चे किती EMI न भरल्यास बँक करते कारवाई? जाणून घ्या

Satish Kengar

What Happens If Emi Is Not Paid 3 Months: गृहकर्जामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करणे सोपे झाले आहे. विशेषत: मोठ्या शहरांमध्ये लोक गृहकर्ज घेऊन सहजपणे फ्लॅट खरेदी करतात. मात्र आता छोट्या शहरांमध्येही फ्लॅट संस्कृती झपाट्याने वाढत आहे. विशेषतः नोकरदार लोकांना गृहकर्ज सहज मिळते.

मात्र अनेक वेळा ग्राहक घराचा ईएमआय (EMI) वेळेवर भरू शकत नाहीत. विशेषत: नोकरी गमावणे किंवा घरात एखादी मेडिकल कंडिशन आल्यास आपण ईएमआय भरणे चुकवतो. तुम्ही गृहकर्जाचे हप्ते न भरल्यास काय होते, हे तुम्हाला माहिती आहे का? बँक किती हप्ते न भरल्यास वाट पाहते आणि मग काय कारवाई केली जाते? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

सलग तिसरा हप्ता न भरल्यास बँक करू शकते कारवाई

गृहकर्ज हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीमध्ये ठेवले जाते, त्यामुळे त्याऐवजी ग्राहकाला कोणतीही मालमत्ता हमी म्हणून बँकेकडे गहाण ठेवावी लागत नाही. गृहकर्जाचा हप्ता न भरण्याबाबत आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत? एखाद्या ग्राहकाने गृहकर्जाचा पहिला हप्ता भरला नाही, तर बँक किंवा वित्तीय संस्था त्याला गांभीर्याने घेत नाहीत. बँकेला असे वाटते की ईएमआयला काही कारणास्तव उशीर होत आहे. (Home Loan Calculator)

परंतु जेव्हा ग्राहक सलग दोन ईएमआय भरत नाही, तेव्हा बँक पहिल्यांदा एक नोटीस पाठवली जाते. यानंतरही ग्राहक तिसरा EMI हप्ता भरण्यात अयशस्वी झाला, तर बँक पुन्हा कर्जाची परतफेड करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवते. (Latest Marathi News)

यातच तिसरा ईएमआय न भरल्याने बँक अॅक्शन मोडमध्ये येते. कायदेशीर नोटीसनंतर कर्जाची परतफेड न केल्यास बँक ग्राहकाला डिफॉल्टर घोषित करते. तसेच बँक कर्ज खाते एनपीए मानते. इतर वित्तीय संस्थांच्या बाबतीत, ही मर्यादा १२० दिवसांची आहे. या कालमर्यादेनंतर, बँक पुनर्प्राप्ती प्रक्रियेबद्दल विचार करू लागते.

तुम्ही हप्ते न भरल्यास बँक तुमची मालमत्ता गहाण ठेवते आणि नंतर बँक ती मालमत्ता विकून कर्ज वसूल करू शकते. मात्र बँकेच्या बाजूने हा शेवटचा पर्याय आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकाला बराच वेळ दिला जातो. कायदेशीररीत्या बँकेला त्याचे पैसे परत मिळण्याचा शेवटचा पर्याय म्हणजे लिलाव. लिलावातून मिळालेली रक्कम कर्जाची रक्कम ऑफसेट करण्यासाठी वापरली जाते.

महत्वाचं म्हणजे तीन महिन्यांपर्यंत हप्ते न भरल्यानंतर बँक ग्राहकाला दोन महिने अधिक वेळ देते. यामध्येही ग्राहक हप्ते भरत नसल्यास बँक ग्राहकाला मालमत्तेच्या अंदाजे मूल्यासह लिलावाची नोटीस पाठवते. जर ग्राहकाने लिलावाच्या तारखेपूर्वी म्हणजे लिलावाच्या सूचनेच्या तारखेपासून एक महिन्यानंतरही हप्ता भरला नाही, तर बँक लिलावाची औपचारिकता पुढे नेते.

हप्ता न भरल्यास एजंटने धमकी दिल्यास काय करावे?

कर्जाची परतफेड करता येत नसल्याने बँकेकडून वसुली एजंट पाठवून ग्राहकांवर दबाव निर्माण केला जातो. त्याला धमकावले जाते. अशी अनेक प्रकरणे देशभरात समोर येत आहेत. गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला रिकव्हरी एजंटकडून त्रास होत असेल, तर तुम्ही थेट पोलिसांत तक्रार करू शकता. कर्जाचा हप्ता न भरणे हे दिवाणी विवादाच्या कक्षेत येत असल्याने, थकबाकीदारावर मनमानी कारवाई करता येत नाही. याशिवाय तुम्ही आरबीआयकडे लेखी तक्रारही करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माणिकराव कोकाटे विजयाच्या उंबरठ्यावर

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT