Home Loan Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Home Loan Tips : घराचं कर्ज फेडताना या टिप्स फॉलो करा, लवकर होईल कर्जातून मुक्ती

How To End Home Loan Quickly : आजच्या काळात घर घेणे हे एक मोठे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण होम लोन घेतो.

Shraddha Thik

Home Loan :

आजच्या काळात घर घेणे हे एक मोठे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अनेकदा होम लोन घेतो. होम लोनची परतफेड शक्य तितक्या लवकर करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. काही टिप्स येथे पाहूयात ज्याच्या मदतीने होम लोन लवकर फेडू शकाल.

अनेकांच्या मनात प्रश्न असतो की त्यांनी कर्ज घ्यावे की नाही. एकीकडे कर्ज (Loan) घेतल्याने आपली अनेक स्वप्ने पूर्ण होतात. त्याचबरोबर अनेक वेळा कर्जामुळे आपण कर्जाखाली गाडले जातो. अशातच घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड कर्ज किंवा होम लोन देखील घेऊ शकता.

बँक तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोअरनुसारच कर्ज देते. कोणतेही गृहकर्ज घेतल्यानंतर, तुमच्याकडे घराचे मालकी हक्क नसतात. घराचे हक्क बँकेला मिळतात. जर एखाद्या व्यक्तीने गृहकर्जाची वेळेवर परतफेड केली नाही तर बँक आपल्या अधिकारांचा वापर करते.

होम लोन हा योग्य पर्याय नाही असे अनेकांचे मत आहे. यामध्ये घर (Home) खरेदीच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम व्याजात खर्च केले जाते. आता अशा स्थितीत एक प्रश्न उद्भवतो की आपण होम लोन लवकरात लवकर कसे फेडणार?

होम लोन लवकर कसे फेडायचे

होम लोन लवकर पूर्ण करण्यासाठी, EMI पेक्षा जास्त पैसे (Money) देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची मूळ रक्कम कमी होईल. अशा स्थितीत, जसे की मूळ रक्कम कमी होते, तुमचा EMI देखील कमी होतो आणि अशा प्रकारे तुम्ही कर्जाची परतफेड लवकर करू शकता. अशा प्रकारे समजून घ्या की जर तुम्ही दरवर्षी EMI द्वारे 5% पेक्षा जास्त रक्कम जमा केली तर तुम्ही 20 वर्षांचे कर्ज फक्त 12 वर्षात पूर्ण करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT