Home Loan Offers Saam Tv
लाईफस्टाईल

Home Loan Offers : दिवाळीत घर घेताय? या बँका देतायत होम लोनवर जबरदस्त ऑफर, ग्राहकांना होणार हे फायदे

Diwali Offer : सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज असे अनेक सण येत्या काही दिवसांत साजरे होणार आहेत.

Shraddha Thik

Offers On Home Loan :

सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. धनत्रयोदशी, दिवाळी (Diwali), भाऊबीज असे अनेक सण येत्या काही दिवसांत साजरे होणार आहेत. या काळात लोक मोठ्या प्रमाणावर घरे आणि कार खरेदी करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना होम लोनवर जोरदार ऑफर (Offer) आणतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज अशाच काही बँकांबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदासारख्या बँकांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व बँकांनी (Bank) दिवाळी 2023 मध्ये होम लोनवर सणाच्या ऑफर सुरू केल्या आहेत . या ऑफर्सबद्दल जाणून घ्या -

एसबीआय होम लोनवर दिवाळी ऑफर

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडियाने खास फेस्टिव्ह ऑफर आणली आहे. ही विशेष ऑफर 1 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान वैध आहे. एसबीआय या विशेष ऑफरद्वारे ग्राहकांना व्याजदरात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ग्राहकांना क्रेडिट स्कोअरनुसार 0.65 टक्के म्हणजेच 65 बेस पॉइंट्सपर्यंत कमाल सवलतीचा लाभ मिळत आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या होम लोनवर दिवाळी ऑफर

पंजाब नॅशनल बँक देखील आपल्या ग्राहकांना होम लोनवर जोरदार ऑफर देत आहे. जर तुम्ही या धनत्रयोदशी आणि दिवाळीत बँकेकडून होम लोन घेतले तर बँक 8.40 टक्के दराने होम लोन देत आहे. यासोबतच प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्रांवर बँक कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. होम लोन मिळवण्यासाठी तुम्ही पीएनबीच्या https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ या वेबसाइटला भेट देऊ शकता . याशिवाय, तुम्ही 1800 1800/1800 2021 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकता.

बँक ऑफ बडोदाकडून होम लोनवर दिवाळी ऑफर

बँक ऑफ बडोदाने दिवाळीनिमित्त 'फीलिंग ऑफ फेस्टिव्हल विथ बीओबी' नावाची विशेष ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध आहे. या फेस्टिव्हल ऑफरद्वारे ग्राहकांना सुरुवातीच्या 8.40 टक्के दराने होम लोन दिले जात आहे. यासोबतच बँक ग्राहकांकडून शून्य प्रक्रिया शुल्क आकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT