सर्वात उत्साही आणि रंगीबेरंगी हिंदू सणांपैकी होळी हा एक सण आहे. या सणाला रंगांचा सण किंवा वसंताचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते. होळी पेटवून (होळी दहन) साजरा केला जातो आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आनंद होतो. हिंदू पंचांगानूसार हा सण फाल्गून महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण दोन दिवस साजरा केला जातो. यंदा हा सण किती तारखेला आहे हे आपण पुढील माहितीने जाणून घेणार आहोत.
2025 मध्ये होळी कधी आहे?
द्रिक पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी १३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुरुवात होईल. तर शेवट १४ जानेवारी २०२५ रोजी दूपारी १२ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होणार आहे. १३ मार्चला होळी पेटवली जाईल आणि १४ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. या दिवशी रंगाचा वापर करून होळी साजरी केली जाते.
होळीची कथा
होळीची कथा भक्त प्रह्लाद आणि दुष्ट राणी होलिकाशी जोडलेली आहे. प्रह्लादाने भगवान विष्णूची भक्ती केल्यामुळे होलिका त्याला मारण्यासाठी आगेत बसली, परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रह्लाद वाचला आणि होलिका स्वतः जळून खाक झाली. या घटनेचे प्रतीक म्हणून होळी पेटवण्याची प्रथा आहे. म्हणून होळी हा सण वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. निसर्ग नवीन रंगांनी सजतो, आणि शेतीच्या पिकांचे थोडेसे यश साजरे करण्यासाठीही हा सण साजरा केला जातो.
होळीची परंपरा आणि विधी
होळी दहन: सणाच्या पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते, ज्याला 'चैत्रकृष्ण प्रतिपदा' म्हणतात. यामध्ये वाईट शक्तींवर विजयाचे प्रतीक म्हणून होळी जाळली जाते.
रंगपंचमी: सणाच्या दुसऱ्या दिवशी लोक विविध रंगांनी खेळतात, गाण्यांचा आनंद घेतात, आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.