Holi 2024 Wishes, Happy Holi 2024 Wishes in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2024 Wishes : होळी रे होळी..., होळीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा!

Happy Holi 2024 Wishes in Marathi: होळीचा सण हा २४ मार्चला साजरा केला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

होळीनिमित्त शुभेच्छा In Marathi :

फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जाणार सण म्हणजे होळी. देशभरात विविध पद्धतीने साजरा केला जाणारा सण होळी. पहिल्या दिवशी होलिका दहन करुन दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते.

होळीला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन अशा विविध नावांनी ओळखले जाते. यंदा होळीचा सण (Holi Festival) हा २४ मार्चला साजरा केला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा (Celebrate) केला जातो. या उत्सवाला होलिकादहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन दोलायात्रा, कामदहन यांसारख्या विविध नावाने ही ओळखले जाते.

फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या सणाला फाल्गुनोत्सव असे म्हणतात. यादिनानिमित्त आपण व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना मेसेज करु शकता. तसेच स्टेटस ठेवून तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,

सण आनंदे साजरा केला

क्षणभर बाजूला सारू

रोजच्या वापरातले वाईट क्षण,

रंग गुलाल उधळू आणि,

रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

परमेश्वराला प्रार्थना आहे की

आजची ही होळी तुमच्या आयुष्यात

आनंदाचे रंग भरो.

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा

होळीचा आनंद साजरा करा! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update : यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

Pragya Singh Thakur : मालेगाव प्रकरणात नरेंद्र मोदींचं नाव घेण्यासाठी टॉर्चर केलं; प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

SCROLL FOR NEXT