HIV Symptoms Saam Tv News
लाईफस्टाईल

HIV: असुरक्षित शारीरिक संबंध, वापरलेली सुई अन्.. HIV कशामुळे होतो? सुरूवातीला दिसतील 'ही' लक्षणं

HIV Symptoms: एचआयव्हीची लक्षणे सुरूवातीला सामान्य फ्लू सारखी दिसू शकतात. पण यांना दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते. जर तुम्ही कधी असुरक्षित शारिरीक संबंध ठेवले असतील तर उशीर न करता लगेच तपासणी करून घ्या. नाहीतर हे तुमच्या मृत्यूचे कारण ठरू शकते.

Bhagyashree Kamble

HIV can caused your death: ह्यूमन इम्यूनोडेफिशिएन्सी व्हायरस (HIV) हा एक गंभीर आजार आहे, जे शरिराच्या इम्यून सिस्टमला अशक्त बनवतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. तसेच शरीरात कोणताही व्हायरस त्वरीत पसरतो. यावर वेळेत उपचार न केल्यास याचे रूपांतर एड्स (AIDS) सारख्या आजारात होते. जर आपलं शरीर एचआयव्हीग्रस्त आहे की नाही, हे जाणून घ्यायचं असेल, तर या लक्षणांना दुर्लक्ष करू नका.

Know how HIV can spread: गाझियाबाद येथील यशोदा रूग्णालयाचे मेडीसिन आणि जनरल फिजिशीयन डॉ. एपी सिंह यांच्या मते, एचआयव्हीची लक्षणे पूर्णपणे सामान्य फ्लू सारखी दिसतात. म्हणूनच बऱ्याचदा ते पटकन कळून येत नाहीत. जर तुम्ही कधी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवले, अथवा वापरलेले इंजेक्शनचा वापर केला, किंवा एचआयव्ही रूग्णाचे रक्त तुमच्या रक्ताच्या संपर्कात आले असेल तर, तुम्हालाही एचआयव्हीची लागण होऊ शकते. तसेच एचआयव्ही असलेल्या आईकडून गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणादरम्यान किंवा स्तनपान करताना तिच्या बाळालाही संसर्ग होऊ शकतो.

एचआयव्हीची लक्षणे काय आहेत?

एचआयव्हीची लक्षणे प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळी दिसतात. ही लक्षणे काही आठवड्यानंतर किंवा वर्षांनंतर देखील दिसू शकतात. पण सुरूवातीच्या २-४ आठवड्यात ताप येणे, थंडी वाजणे, थकवा आणि अशक्तपणा येणे, पाठिच्या कण्याजवळील ग्रंथी दुखणे किंवा सुजणे, त्वचेवर लाल फोड, खाज येणे, स्नायूंचे दुखणे, रात्री झोपताना खाज येणे, वजन कमी होणे, घसा बसणे, तोंड येणे इ. लक्षणे दिसतात.

अँटीरेट्रोव्हायरल थेरपीच्या (ART) मदतीने एचआयव्हीचा संसर्ग रोखता येतो. तसेच योग्य ती काळजी घेतल्यास तुम्ही स्वत:ला एचआयव्हीपासून मुक्त होऊ शकता. यासाठी सूरक्षित शारिरीक संबंध ठेवा, कोणाचेही उष्टे खाऊ नका, सतत हस्तांदोलन करणे टाळा, मिठी मारणे किंवा भांडी शेअर करणे टाळा, एचआयव्ही रक्तामार्गे पसरतो त्यामुळे इंजेक्शन घेताना नेहमी सुई नवीन असेल याची काळजी घ्या. तसेच तुम्ही एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर शक्य तितक्या लवकर PEP (Post-Exposure Prophylaxis) औषधे सुरू करा.

टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT