Fashion Trends 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Fashion Trends 2024: स्टायलिश लूकसाठी तुम्ही सुद्धा हाय वेस्ट आणि वाईड लेग जिन्स वेअर करता? वाचा याचे भन्नाट फायदे

High Waist and Wide Length Jeans Benefits : तुम्ही अजून ही जिन्स घेतली नसेल तर पुढील फायदे नक्की वाचा. फायदे वाचल्यावर तुम्हाला देखील ही जिन्स खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही.

Ruchika Jadhav

जिन्स म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात कंफर्टेबल कपडे. महिला असो अथवा पुरूष प्रत्येकाच्या कपड्यांच्या कलेक्शनमध्ये जिन्स असतेच. ही जिन्स तुम्ही कॅज्युअल आउटफीट, पार्टी, ट्रॅवलींग आणि अगदी शर्ट, टी-शर्टसह ऑफिसमध्ये देखील काही व्यक्ती परिधान करतात. महिला आणि मुलींकडेतर जिन्सच्या अनेक वरायटी आहेत.

शेपींग, बॉडी फिट, अँकल लेन्थ, स्लिम फिट, बूट कट आणि बॉयफ्रेंड जिन्स सुद्धा बाजारात मिळते. यातील अनेक महिलांची सर्वात आवडती जिन्स म्हणजे हाय वेस्ट आणि वाईड लेग जिन्स आहे. अनेक महिला शक्यतो अशीच जीन्स वापरताना पाहायला मिळतात. महिलांना ही जिन्स परिधान केल्याने अनेक फायदे होतात. आता तुम्ही अजून ही जिन्स घेतली नसेल तर पुढील फायदे नक्की वाचा. फायदे वाचल्यावर तुम्हाला देखील ही जिन्स खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही.

बेली फॅट गायब

विविध प्रकारच्या जिन्स परिधान करताना त्या पोटाच्या खाली असतात. त्यामुळे जाड किंवा मग बेली फॅट जास्त असलेल्या महिलांना जिन्स चांगली दिसत नाही. त्यामुळे हाय वेस्ट आणि वाईड लेग जिन्स वेअर केल्याने यात तुमचं बेली फॅट झाकलं जातं आणि तुम्ही स्लिम दिसता. या जिन्सवर तुम्ही लाँग कुरती किंवा टॉप सुद्धा वेअर करू शकता.

उंची जास्त वाढते

हाय वेस्ट जिन्स परिधाना करणे आपल्या लूकसाठी फार उत्तम आहे. अनेक मुलींची उंची फार कमी असते. अशावेळी उंच दिसण्यासाठी त्या हाय हिल्ससह अनेक ट्रिक्स ट्राय करतात. हाय वेस्ट जिन्स वेअर केल्याने आपण उंच दिसतो. त्यामुळे सुद्धा उंच दिसण्यासाठाी ही जिन्स ट्राय करू शकता.

जिन्स खालून खराब होत नाही

साध्या आणि लो वेस्ट असलेल्या जिन्समध्ये पायाच्या ठिकाणी जिन्स थोडी खाली घसरते. त्यामुळे जिन्सला धूळ माती लागून ती खराब लुद्धा होते. मात्र तुम्ही हाय वेस्ट जिन्स घातल्यास ती जास्त खाली तरंगत नाही आणि खराब होत नाही.

स्टायलीश लूक करणे सोप्प

हाय वेस्ट जिन्स आणि वाईड लेग जिन्स आपल्याला अतिशय कम्फर्टेबल वाटतात. त्यामुळे स्टायलीश लूक तयार होतो. तुम्ही कोणत्याही टॉप, टी-शर्ट आणि कुरत्यावर सुद्धा या जिन्स परिधान करू शकता. यामुळे तुम्हाला नेहमी नवा आणि झकास लूक मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT