Sakshi Sunil Jadhav
यशामध्ये आपण समाधान शोधाल असा दिवस आहे. गणेश उपासना फलदायी ठरेल.
मातृसौख्य उत्तम राहील. आज विनायक चतुर्थी, नागचतुर्थी घरामध्ये धार्मिक कार्य होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. दिवस चांगला आहे .
वाणी लेखणीच्या माध्यमातून प्रगती होईल. जवळच्या प्रवासामधून प्रगती साधाल.दिवस चांगला आहे.
आज पैशाची आवक जावक चांगली राहील. कौटुंबिक सौख्य उत्तम आहे.
स्वतःवर प्रेम करणं हे आधी गरजेचे आहे हे आज समजून जाईल. दानत आणि उदारता वाढेल.
उगाचच विचार करणे आज टाळलेले बरे. पैशाचे व्यवहार जपून करावे.
आयुष्यामध्ये असलेल्या गोष्टींविषयी आज चांगले भाव निर्माण होतील. जवळच्या व्यक्तींना बरोबर घेऊन जाल. ठराविक गोष्टीत वेगळा आनंद मिळेल.
अनेक आघाड्यांवर एकटे काम करावे लागेल. अर्थात यामध्येच आपल्याला समजेल की आपले नाणे खणखणीत आहे. नेटाने आणि जिद्दीने कामे कराल आणि यश मिळवाल.
विनायक चतुर्थी आहे. दत्त उपासना, गणेश उपासना फलदायी ठरेल. मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी भगवंताची आराधना फायदेशीर ठरेल.
अचानक मोठा पैसा मिळवाल. पैशाच्या बाबतीत जपून खर्च करणे गरजेचे आहे. आपली रास चिकट आणि व्यवहारी आहे.
जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे गेलात तर कामे सुकर होतील. व्यावसायिक भागीदारा बरोबर महत्त्वाच्या बैठका पार पडतील.
तब्येतीच्या कुरबुरी डोकं वर काढतील. स्वतःकडे लक्ष देऊन मग कामाला प्राधान्य देणे जास्त फायद्याचे ठरेल.
NEXT: पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा