
मंगळ आणि बुध ग्रहांची युती २०२५ च्या जुलै महिन्याच्या अखेरीस होणार आहे.
या युतीचा परिणाम ५ राशींवर विशेषतः होणार आहे.
काही राशींना आर्थिक, मानसिक आणि वैयक्तिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वैदिक ज्योतिषानुसार या काळात संयम आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ (Mars) ग्रहाला ऊर्जा, साहस, पराक्रम, भूमी आणि विवाहाचा कारक ग्रह मानले जाते. मंगळ ग्रह जुलै महिन्याच्या शेवटी संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे दोन शत्रू ग्रहांची युती होणार असून त्याचा परिणाम ५ राशींवर होणार आहे. या राशीच्या जातकांच्या आयुष्यात संकट आणि अडचणी येणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार 28 जुलै 2025 रोजी मंगळ ग्रह संध्याकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे मंगळ आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. मंगळ आणि बुध एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. त्याच्या परिणाम काही राशींच्या जीवनावर होणार आहे. त्यांना आरोग्य आणि आर्थिक कटकटीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मंगळ ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या फार नुकसानकारक ठरेल. या काळात खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, पैशांचा विनाकारण खर्च होणार घरात वादविवाद होऊ शकतात.नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीसाठीही हे संक्रमण खूप आव्हानात्मक असणार आहे. या काळात आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव येईल. तणाव असल्यानं कोणत्याच कामात मन रमणार नाही आणि तुमची चिडचिड होईल.
धनु राशीसाठी सुद्धा मंगळ आणि बुध ग्रहाची युती घातक ठरू शकते. त्यांच्या करिअरसाठी फार आव्हानात्मक काळ राहणार आहे. या काळात ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ऑफिस पॉलिटिक्स होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यापासून दूर राहिले पाहिजे. मेहनतीचं फळ तुम्हाला तितकंसं मिळणार नाही.
या संक्रमणाच्या काळात मकर राशीच्या लोकांनीही सावध राहावे लागले. कोणत्याही कारण असेल तरी लांबच्या प्रवास टाळलं पाहिजे. कामाच्या बाबतीत सतर्कता ठेवावी. धैर्याने काम करावे.
या राशीसाठी हा काळ फार धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या काळात वैवाहिक पार्टनरबरोबर वादविवाद होऊ शकतात. आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे समजूतदारीने व्यवहार करणं गरजेचं आहे. घरात होणाऱ्या वादापासून दूर राहिलं पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.