Heart Attack Risk google
लाईफस्टाईल

High Cholesterol: कोलेस्टेरॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका, या ४ सवयी लगेचच सोडा अन् जीव वाचवा

Heart Attack Risk: वाढलेला कोलेस्ट्रॉल हृदयासाठी गंभीर धोका ठरू शकतो. धूम्रपान, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव हार्ट अटॅकचा धोका वाढवतो, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.

Sakshi Sunil Jadhav

आजच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे वाढलेला कोलेस्ट्रॉल हा एक गंभीर आजार आणि अनेकांची डोके दुखी बनला आहे. रक्तामधील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, असा इशारा तज्ज्ञ डॉक्टर देतात. बरीच मंडळी त्यांच्या आळशीपणामुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे या समस्यांना स्वत:कडे ओडून घेतात.

कोलेस्ट्रॉल हा रक्तामधला एक प्रकारचा फॅट आहे जो शरीरासाठी काही प्रमाणात आवश्यक असतो. त्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त झालं की ते आरोग्यासाठी घातक ठरतं. अनेकदा लोकांना वाटतं की, फक्त अनुवांशिक कारणांमुळेच कोलेस्ट्रॉल वाढतो, पण प्रत्यक्षात काही चुकीच्या सवयी यासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात.

तज्ज्ञांच्या मते धूम्रपान ही कोलेस्ट्रॉल वाढवणारी सर्वात धोकादायक सवय आहे. सिगारेटमुळे रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींच नुकसान होतं आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्याचबरोबर चुकीचा आहार, विशेषतः सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, जास्त तेलकट पदार्थ, जंक फूड आणि रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्सचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो. यामुळे वजन वाढ, इन्सुलिन रेसिस्टन्स, सूज आणि ‘गुड कोलेस्ट्रॉल’ म्हणजेच HDL कमी होण्याची शक्यता असते.

शारीरिक हालचाली कमी होणे हे सुद्धा याचं मोठं कारण असू शकतं. नियमित व्यायाम न केल्याने शरीरात जास्तीचा फॅट कमी होत नाही आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणाबाहेर जातं. तसेच वाढलेले वजन किंवा लठ्ठपणा हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते योग्य आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणं, वजन नियंत्रणात ठेवणं आणि तणावमुक्त जीवन जगणं या सवयींनी कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रणात ठेवता येतो आणि हृदय निरोगी राहू शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT