Sakshi Sunil Jadhav
अनेक महिलांना उंची कमी असल्यामुळे त्यांना कोणत्या पद्धतीच्या फॅब्रिकच्या साड्या नेसायच्या हा प्रश्न मनात कायम असतो.
महिलांना कॉटनच्या साड्या व्यवस्थित म्हणजेच चापूनचोपून बसतात. त्यामुळे अशा साड्यांचा वापर तुम्ही काही ट्रीक्सने केला पाहिजे.
कॉटन साडी नीट प्लीट्स करून नेसा. त्याने बॉडी स्ट्रक्चर स्लिम दिसतं आणि उंची जास्त दिसते.
मोठ्या प्रिंट्स किंवा हेवी डिझाइनपेक्षा लहान बुट्टी, स्ट्राइप्स किंवा सटल पॅटर्न असलेल्या कॉटन साड्या कमी उंचीच्या महिलांवर जास्त शोभून दिसतात.
कॉटन साड्या हलक्या असल्याने त्या अंगावर नीट बसतात आणि नेसताना फुगिर दिसत नााहीत. त्यामुळे एलिगंट लूक मिळतो.
सरळ (Vertical) बॉर्डर किंवा पातळ बॉर्डर असलेली कॉटन साडी उंची जास्त दाखवण्यास मदत करते.
एकाच रंगाच्या किंवा जवळच्या शेड्समधील कॉटन साडी नेसल्याने बॉडी लांब आणि स्लिम दिसते.
डीप नेकलाइन, स्लीव्हलेस किंवा शॉर्ट स्लीव्ह ब्लाउज कॉटन्या साडीचा लूक बॅलन्स करतात आणि उंची जास्त जाणवते.
खूप जाड कॉटनपेक्षा कॉटन सिल्क किंवा फाइन कॉटन फॅब्रिक कमी उंचीच्या महिलांसाठी योग्य ठरते.