Cholesterol Lowering Breakfast saam tv
लाईफस्टाईल

Cholesterol Lowering Breakfast: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर येऊ शकतो हार्ट अटॅक; फक्त या 4 पदार्थांचा नाश्त्यात करा समावेश, धोका लगेच टळेल

Foods to lower bad cholesterol: वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ओट्स, संत्री, सॅल्मन मासा आणि अंड्याचा पांढरा भाग खाण्याचे फायदे जाणून घ्या. हे पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकतात, तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी आहारात कोणते बदल करावेत, हे वाचा.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण सकाळचा नाश्ता करण्याकडे दुर्लक्ष करतात. ऑफिसला जाण्याची घाई असो किंवा इतर कामं, अनेकदा नाश्ता न करताच घराबाहेर पडण्याची सवय असते. मात्र सकाळचा नाश्ता टाळणं आरोग्यासाठी चांगलं नाही. दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. याचा फायदा हृदयाच्या आरोग्यालाही होऊ शकतो.

शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल (LDL) वाढल्यास हार्ट अटॅकचा वाढू शकतो. त्यामुळे आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. काही पदार्थांचा नाश्त्यात समावेश केल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. याउलट नाश्ता टाळण्याची सवय आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आरोग्यावर परिणाम करू शकतात.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत?

ओट्स

ओट्स हा सकाळच्या नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये विरघळणारे फायबर असते. हे फायबर पचनसंस्थेत वाईट कोलेस्ट्रॉलचं शोषण कमी करण्यास आणि ते शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करू शकते. ओट्स अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात सफरचंद, नाशपाती किंवा स्ट्रॉबेरीसारखी फळं घालून खाऊ शकता.

नाश्त्यात खा संत्री

संत्रं हे सहज उपलब्ध होणारं फळ आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय संत्र्यात फायबरही असतं जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतं. संत्र्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी त्याचा रस पिण्यापेक्षा फळ सालीपासून वेगळं करून आतील संपूर्ण गर खाल्ला. संत्र्याचा रस प्यायल्यानेही काही पोषक घटक मिळतात.

स्मोक्ड सॅल्मन मासा

सॅल्मन हा ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असलेला मासा आहे. ओमेगा-३ हे शरीरासाठी आवश्यक असलेले चांगले फॅट्स आहेत. ते रक्तातील ट्रायग्लिसराइड्स म्हणजेच एका प्रकारच्या चरबीचं प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतात. हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरतात. नाश्त्यात स्मोक्ड सॅल्मनचा समावेश करायचा असल्यास त्यासोबत टोमॅटो, केपर्स आणि तीळ यांसारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

अंड्याचा पांढरा भाग

अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. मात्र कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याची काळजी घेत असाल तर अंड्याच्या पांढऱ्या भागाचा नाश्त्यात समावेश करू शकता. अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन भरपूर असतात आणि त्यात आहारातील कोलेस्ट्रॉल नसतं. शरीराला आवश्यक प्रोटीन मिळाल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यासाठीही त्याचा फायदा होतो.

नाश्त्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करू नका

सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील महत्त्वाच्या आहारांपैकी एक आहे. ओट्स, संत्री, सॅल्मन मासा आणि अंड्याचा पांढरा भाग यांसारख्या पदार्थांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळू शकतात. मात्र कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ नाश्त्यावर अवलंबून न राहता दिवसभराचा आहार आणि जीवनशैली यांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tulsi Tea Benefits: बदलत्या हवामानात आले-तुळशीचा चहा ठरेल आरामदायी; शरीराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

फॉर्म ६ मध्ये कोणताही बदल नाही, निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञामपत्रात सादर; सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी, काय होणार?

Maharashtra News Live Update: शुद्ध इथेनॉलवर चालणाऱ्या ई-१०० वाहनांचा मार्ग मोकळा

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: पुण्यात मतमोजणी केंद्रात जाताना प्रतिनिधींकडे सापडलं लिंबू

Refrigerator gas leak: फ्रीजचा गॅस संपलाय हे कसं ओळखाल; या आहेत सोप्या टीप्स

SCROLL FOR NEXT