Milk Storage Tips: फ्रिजमध्ये दूध किती दिवस चांगले राहते? दूध खराब झाल्यास कसे ओळखायचे? जाणून घ्या योग्य पद्धत

Manasvi Choudhary

दूध

आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी चहा बनवण्यासाठी दररोज दूध आणले जाते. बाजारातून दूध आणल्यानंतर आपण ते उकळतो आणि थंड झाल्यानंतर सुरक्षित राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो.

Milk | pinterest

फ्रिजमध्ये दूध नेमके किती दिवस चांगले?

मात्र, बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की, फ्रिजमध्ये दूध नेमके किती दिवस चांगले राहते?" आणि दूध खराब झाले आहे हे कसे ओळखावे?

Milk In Fridge

फ्रिजमध्ये दूध साठवण्याची योग्य पद्धत

फ्रिजमध्ये दूध साठवण्याची योग्य पद्धत आणि खराब झाले आहे ते ओळखण्याचे काही नियम आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Milk In Fridge | pinterest

फ्रिजमध्ये दूध किती दिवस आणि कसे ठेवावे?

फ्रीजचे तापमान ४ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, दूध साधारणपणे ४ ते ५ दिवस सुरक्षित आणि ताजे राहू शकते.

Milk | pinterest

पॅकबंद दुधाची मर्यादा

हवाबंद पाकिटातील दूध जोपर्यंत सीलबंद असते, तो पर्यंत ते टिकते. परंतु, एकदा पाकीट उघडल्यानंतर ते साधारण ३ ते ४ दिवस टिकते.

Milk In Fridge | pinterest

गरम दूध कधीही लगेच फ्रिजमध्ये ठेवू नका

उकळलेले दूध ताबडतोब गरमच्या गरम फ्रिजमध्ये ठेवू नका. असे केल्याने फ्रिजमधील इतर अन्नावर आणि दुधाच्या तापमानावर वाईट परिणाम होऊन दूध लवकर खराब होऊ शकते. दूध पूर्णपणे थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवावे.

Milk | pinterest

फ्रिजमध्ये दूध साठवण्याची योग्य पद्धत

दूध नेहमी फ्रिजच्या दरवाज्या जवळील छोट्या कप्प्यात ठेवू नका. कारण दरवाजा वारंवार उघडल्या-बंद केल्याने तापमानात बदल होतो. दूध नेहमी फ्रिजच्या आतील भागात ठेवा, जिथे तापमान स्थिर राहते.

Milk In Fridge | pinterest

दूध झाकून ठेवा

फ्रिजमध्ये दूध ठेवताना नेहमी भांड्यावर घट्ट झाकण ठेवा, जेणेकरून फ्रिजमधील इतर पदार्थांचा तीव्र वास दुधात जाणार नाही आणि दुधाची चव बिघडणार नहीं.

Milk In Fridge | yandex

दूध खराब झाल्यास कसे ओळखाल?

दुधाला नेहमीच्या सुवासिक वासाऐवजी आंबट किंवा कुबट वास येऊ लागल्यास, दूध खराब झाले आहे हे समजावे.

दूध थोडेसे गरम केल्यावर किंवा साधेच असताना ते तळाशी दाणेदार किंवा घट्ट होऊ लागले, तर दूध वापरण्यायोग्य राहिलेले नाही.

Milk | GOOGLE

दुधाची चव

दुधाची चव नेहमीसारखी गोडसर न राहता आंबट लागत असेल, तर ते पूर्णपणे खराब झाले आहे.

Milk In Fridge | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Best Drinks for Liver Health : लिव्हरच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ 5 बेस्ट ड्रिंक्स; यकृतावरची हट्टी चरबी झटक्यात होईल कमी

Best Drinks for Liver Health
येथे क्लिक करा..