Best Drinks for Liver Health : लिव्हरच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ 5 बेस्ट ड्रिंक्स; यकृतावरची हट्टी चरबी झटक्यात होईल कमी

Manasvi Choudhary

यकृतावर परिणाम

आजच्या बदलत्या जीवनशैलीत जंक फूड, बाहेरचे तेलकट खाद्यपदार्थ आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पचनसंस्थेवर आणि यकृतावर वाईट परिणाम होतो.

Liver | pinterest

यकृताचे कार्य सुधारणे

यामुळे यकृताचे आरोग्य बिघडते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम यकृत करते मात्र यकृतावर ताण आल्याने अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे त्याचे कार्य मंदावते.

Liver Damage

हेल्दी ड्रिंक्स

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि साठलेली चरबी कमी करण्यासाठी औषधांऐवजी काही हेल्दी ड्रिंक्सचे सेवन तुम्ही करू शकता ते कोणती आहेत या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

5 Healthy Drinks | pinterest

ग्रीन टी

ग्रीन टी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. यामध्ये असणारे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स (विशेषतः कॅटेचिन्स) यकृतात साठलेली चरबी कमी करण्यास आणि शरीरातील विषारी घटकबाहेर टाकण्यास मदत करतात.

green tea | pinterest

लिंबू पाणी

कोमट लिंबू पाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. हे सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने यकृतावरील ताण कमी होतो आणि लिव्हर एन्झाईम्सचे कार्य अधिक सुधारण्यास मदत मिळते.

Lemon Water

बीटचा रस

बीटाचा रस पोषक तत्त्वांनी समृद्ध असतो. यामध्ये 'बेटालिन्स' आणि 'बेटाइन्स'नावाचे घटक असतात, जे नैसर्गिकरीत्या यकृताचे कार्य सुधारतात आणि रक्ताभिसरण वाढवून लिव्हर डिटॉक्स करतात.

beetroot juice

ब्लॅक कॉफी

फॅटी लिव्हरच्या समस्येसाठी ब्लॅक कॉफी हेल्दी ड्रिंक मानले जाते. कॉफीमध्ये असणारे क्लोरोजेनिक ऍसिड आणि कॅफिन यकृतावरील सूज कमी करण्यास मदत करते.

Black Coffee

अॅपल सायडर व्हिनेगर

एका ग्लास कोमट पाण्यात १ चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्यास त्यातील ऍसिटिक ऍसिड शरीराची पचनक्रिया सुधारते आणि यकृतात जमा होणाऱ्या अतिरिक्त चरबीचे विघटन करण्यास मदत करते.

apple cider vinegar | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Morning Tea Side Effects: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ॲसिडीटी होते का? आरोग्यावर होणारे 5 परिणाम जाणून घ्या

Morning Tea Side Effects
येथे क्लिक करा...