Manasvi Choudhary
आपल्यापैकी अनेकांना चहा पिण्याची सवय असते. चहा घेतल्याने मूड फ्रेश होण्यास मदत होते.
मात्र अनेकजण सकाळी रिकाम्या पोटी चहा पितात. पण तुम्हाला माहितीये का? रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
चहामध्ये कॅफिन आणि टॅनिनचे प्रमाण जास्त असते. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात ऍसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तीव्र ऍसिडिटी, छातीत जळजळ आणि गॅसची समस्या निर्माण होते
चहामध्ये दूध आणि साखरेचा वापर केला जातो. रात्रीच्या उपवासानंतर सकाळी अचानक रिकाम्या पोटी हे मिश्रण पोटात गेल्यामुळे पोटावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे पोटात मळमळणे किंवा उलट्यांसारखे वाटू शकते.
झोपेतून उठल्यावर जठराचे कार्य सुरू होण्याआधीच चहा प्यायल्याने पचनसंस्थेचे संतुलन बिघडते आणि पोटात हानिकारक आम्ल तयार होऊ लागते, ज्यामुळे अपचन होऊ शकते
चहामधील कॅफिन रिकाम्या पोटी थेट शरीरात गेल्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने वाढू शकतात. यामुळे काही वेळा अस्वस्थता जाणवणे, चक्कर येणे किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.