प्रवास करणं नक्कीच आनंददायी असतो. पण तो शरीर आणि मन दोन्हींसाठी थकवणारा ठरू शकतात. जर तुमचा रक्तदाब नियंत्रित नसेल तर प्रवास तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. अनेकदा BP चे रुग्ण औषधं सोबत नेत नाहीत किंवा कुठेही काहीही खातात.
प्रवासामुळे होणारा थकवा रुग्णाची स्थिती अधिक बिघडवू शकतो. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे कार्डियोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. प्रवीण काहले यांनी प्रवासादरम्यान उच्च रक्तदाब कसा नियंत्रणात ठेवावा याबाबत माहिती दिलीये.
प्रवासादरम्यान रक्तदाबाची औषधं घेणं टाळणं धोकादायक ठरतं. यामुळे अचानक BP वाढू शकतो. परिणामी चक्कर येणं, बेशुद्ध पडणं आणि गंभीर अवस्थेत मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो. विशेषतः ज्यावेळी BP 200 mmHg पेक्षा जास्त होतो.
विमान प्रवासादरम्यान 6,000–8,000 फूट उंचीवर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. यामुळे शरीरावर ताण वाढतो आणि BP वाढू शकतो. जर फ्लाइटमध्ये उशीर झाला किंवा टर्ब्युलन्स आला तर धोका आणखी वाढतो.
उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हटलं जातं कारण सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणं दिसत नाहीत. अनेकदा स्वतःला फिट समजणाऱ्या लोकांमध्येही उच्च रक्तदाब आढळतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे.
अन्न, झोप आणि तणाव यांसारखे घटक BP वर परिणाम करतात. प्रवासादरम्यान हे घटक विस्कळीत होतात. त्यामुळे आधीच वैद्यकीय नियोजन करणं आवश्यक आहे.
प्रवासादरम्यान लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
BP ची औषधं कधीही चुकवू नये
नियमितपणे BP तपासा
प्रवासादरम्यान पुरेसं पाणी प्या
संतुलित आहार आणि झोपेची काळजी घ्या
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.