High Blood Pressure Diet google
लाईफस्टाईल

High Blood Pressure : आहारात करा या ६ गोष्टींचा समावेश; ब्लड प्रेशरच्या धोका होईल कमी, डॉक्टरांनी सांगितला डाएट प्लान

High Blood Pressure Diet: उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी आहारात बदल आवश्यक आहे. मीठ कमी करा, फळे-भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करा. योग्य जीवनशैली आणि डॉक्टरांनी सांगितलेला डाएट प्लान आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होताना पाहायला मिळत आहेत. आपण कामानिमित्त बराचवेळ घराबाहेर असतो, त्यामुळे आपल्याला बाहेरचं अन्न खावं लागतं. बऱ्याचदा यामध्ये आपण फळं, नारळपाणी असे पर्याय खाण्यात किंवा पिण्यात निवडत नाही. आपण छान चटपटीत पदार्थ खातो. तेलात तळलेले एक्सट्रा चीज, मेयो, किंवा इंस्टंट फूड्स जसे नुडल्स, पास्ता हे सगळे पदार्थ खातो. एकदा बाहेरचं खाण्याची सवय लागली की, घरचं जेवण आपल्याला बेचव वाटायला लागतं. पण यानेच भविष्यात तुम्हाला जीवघेण्या समस्येला सामोरं जावं लागतं.

कारण तुमचा आहार तुमचं आरोग्य ठरवत असतं. जेव्हा तुम्ही चुकीचा आहार घेता. तेव्हा तुमच्या शरीरात अनेक बदल होतात आणि तुम्हाला भविष्यात हार्ट अटॅकच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. त्यात जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आहारात वेळीच बदल करुन घेतले पाहिजेत. असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. जर तुम्ही ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल आणि आहारात काही बदल केले नाहीत तर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा धोका हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं.

सगळ्यात आधी तुम्ही मीठ तुमच्या आहारातून पूर्णपणे काढून टाकलं पाहिजे. कारण त्याने शरीरातलं सोडियमचं प्रमाण वाढतं आणि शरीरातलं पाणीही वाढतं. त्याने रक्तवाहिन्यांमधला दाब वाढायला लागतो. तुम्ही त्याऐवजी चवीसाठी ओरेगानो, लसूण, रोजमेरी यांसारख्या नैसर्गिक मसाल्यांचा वापर करु शकता.

BPच्या रुग्णांनी फळं आणि भाज्या यांचा रोजच्या आहारात न चुकता समावेश केला पाहिजे. यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, जे शरीरातल्या सोडियमला बॅलेन्स करतं आणि रक्तवाहिन्यांवरीचा ताण कमी करतं. केळी, संत्री, पालक आणि रताळी यांसारखे पदार्थ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच आहारात मसूर, हरभरे, राजमा, बीन्स आणि कडधान्यं, ब्राउन राईस, ओट्स, क्विनोआ आणि होल व्हीट ब्रेड याचा समावेश योग्य ठरतो. हर्बल टी, हिबिस्कस, ग्रीन टी, कॅमोमाइल टी यांसारख्या पेयाचा वापर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी करु शकता. एकूणच, औषधांसोबतच योग्य आहार आणि हेल्दी जीवनशैली फॉलो केल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT