Mahabaleshwar Travel SAAM TV
लाईफस्टाईल

Mahabaleshwar Travel : अनेकांच्या नजरेपासून दूर महाबळेश्वरमधील शांत-सुंदर ठिकाणं, एकदा पाहाल तर प्रेमात पडाल

Monsoon Special : पावसाळ्यात मुंबई जवळ फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन म्हणजे महाबळेश्वर. यंदा शरीराला आणि मनाला आराम देण्यासाठी महाबळेश्वरवर मधील निसर्गाच्या कुशीत लपलेली ठिकाणांना भेट द्या आणि निवांत वेळ घालवा.

Shreya Maskar

भटकंती प्रेमींसाठी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे ठिकाण बेस्ट हिल स्टेशन आहे. सुट्टी मिळताच मुंबईच्या गजबजलेल्या जीवनातून वेळ काढण्यासाठी आपण स्वस्तात मस्त आणि मुंबईजवळ असलेल्या महाबळेश्वर या हिल स्टेशनला भेट देतो. मात्र असंख्य वेळा तिथे जाणून नेहमीची तिचं ठिकाणे पाहून कंटाळा आला असेल, तर महाबळेश्वरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलेली निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या आणि तुमची सफर एन्जॉय करा.

मॅप्रो गार्डन

महाबळेश्वरमध्ये लहान मुलांना मजा करता येईल असे ठिकाण म्हणजे मॅप्रो गार्डन. ही बाग स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे स्ट्रॉबेरी महोत्सव आयोजित केला जातो. मुलांना आवडेल असे हे ठिकाण आहे. तुम्ही कुटुंबासोबत येथे वीकेंड प्लान करू शकता.

एलिफंट पॉइंट

एलिफंट पॉइंटला विंटेज पॉइंट म्हणून ओळखले जाते. ही जागा हत्तीचे डोके आणि पाठी सारखी दिसते. हे दृश्य पाहायला पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात. येथील हिरवळीचे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य आणखी खुलून येते.

वेण्णा लेक

वेण्णा लेक हा महाबळेश्वरमधील मानवनिर्मित तलाव आहे. वेण्णा लेक चहुबाजूंनी झाडांनी वेढलेला आहे. त्यामुळे येथील वातावरण थंड असते. तलावाच्या परिसरात तुम्ही घोडेस्वारीचा आनंद लुटू शकता. येथे संध्याकाळी भेट द्यावी कारण सूर्यास्ताचे सुंदर दृश्य तुम्हाला पाहता येईल. पावसाळ्यात ओल्याचिंब रस्त्यांवरून आपल्या जोडीदारासोबत चालण्याची मजाच वेगळी आहे.

केट्स पाँईंट

केट्स पाँईंट हे महाबळेश्वर मधील मनाला मोहून टाकणारे अविस्मरणीय ठिकाण आहे. हे महाबळेश्वर मधील पर्यटकांचे आकर्षण आहे. केट्स पाँईंट आजूबाजूला दर्‍या, भव्य पर्वत रांगांचे विलोभनीय दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल.

तापोळा

तापोळा हे महाबळेश्वर मधील शिवसागर तलावाच्या काठावर वसलेले निसर्गरम्य गाव आहे. येथे आल्यावर तुम्हाला हिरवीगार जंगले, उंच टेकड्या पाहायला मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT