सततचं पाठीचं दुखणं पॅनक्रियाज कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
या वेदनांसोबत वजन कमी, पिवळेपणा किंवा मळमळ अशी लक्षणं दिसतात.
सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात.
दीर्घकाळ वेदना राहिल्यास डॉक्टरांकडून तपासणी करणं अत्यावश्यक आहे.
पाठीचं दुखणं हे आजच्या काळात सर्वसामान्य झालं आहे. तासंतास एकाच जागेवर बसणं, चुकीची बसण्याची पद्धत, ताण, किंवा स्नायू ताणल्यामुळे होणारं हे दुखणं अनेकदा किरकोळ मानलं जातं. मात्र, काही वेळा हे फक्त स्नायूचं दुखणं नसून, शरीरात लपलेला गंभीर आजार पॅनक्रियाज कॅन्सर याचा इशारा असू शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
पॅनक्रियाज म्हणजे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव जो पचनक्रिया आणि साखर नियंत्रणात ठेवण्याचं काम करतो. या भागात गाठी तयार झाल्यास त्या मागील स्नायूंवर आणि नसांवर दाब येतो. ज्यामुळे पाठीच्या मध्यभागी किंवा वरच्या पोटाजवळ वेदना जाणवू शकतात. या वेदना हळूहळू वाढत जातात आणि सामान्य उपचारांनी आराम मिळत नाही.
साधं पाठीचं दुखणं शारीरिक हालचालींनुसार कमी-जास्त होतं, पण कॅन्सरशी संबंधित वेदना सतत राहतात झोपल्यावर वाढतात. तसेच या वेदनांसोबत भूक न लागणे, वजन कमी होणे, मळमळ, त्वचा-पांढरेपणा किंवा पिवळेपणा (जॉन्डिस), गडद लघवी, आणि थकवा अशी लक्षणं दिसल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
पॅनक्रियाज कॅन्सरचा धोका सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला तर उपचार जास्त प्रभावी ठरतात. त्यामुळे दीर्घकाळ अनियमित स्वरूपाचं पाठीचं दुखणं हलकं न घेता तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने आजार उशिरा निदान होतो आणि उपचारांची संधी कमी होते. म्हणूनच, पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता त्यामागील मूळ कारण ओळखणं हेच आरोग्य टिकवण्याचं पहिले पाऊल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.