Hero-Honda New Bike Saam Tv
लाईफस्टाईल

Hero-Honda New Bike : हीरोची होंडासोबत जबरदस्त टक्कर ! स्प्लेंडरच्या तुलनेत होणार लवकरच नवी बाईक लॉन्च

Honda new bike launch : ही बाईक कधी लॉन्च होणार आणि कोणत्या किंमतीला ही बाईक भारतीय बाजारात सादर केली जाऊ शकते.

कोमल दामुद्रे

Hero-Honda New Bike : जपानी दुचाकी निर्माता कंपनी होंडा लवकरच ही नवीन बाईक लाँच करणार आहे. त्याची तयारी कंपनी करत आहे.

आम्ही तुम्हाला या बातमीत सांगत आहोत की ही बाईक कधी लॉन्च होणार आणि कोणत्या किंमतीला ही बाईक भारतीय बाजारात सादर केली जाऊ शकते.

1. फीचर्स

Honda कडून याची पुष्टी करण्यात आली आहे की लवकरच ही नवीन बाईक भारतीय (Indian) बाजारात (Market) लॉन्च केली जाईल. कंपनीने सांगितले आहे की नवीन बाईक 15 मार्च रोजी लॉन्च केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार ही बाईक कंपनी 100 सीसी सेगमेंटमध्ये सादर करणार आहे. आत्तापर्यंत, कंपनीने (Company) या सेगमेंटमध्ये कोणतीही बाइक ऑफर (Offer) केलेली नाही. कंपनी 110 cc सेगमेंटमध्ये CD 110 ऑफर करते.

2. कोणाला देईल टक्कर

होंडाची नवीन 100 सीसी बाईक थेट Hero च्या 100 cc बाईक स्प्लेंडरला आव्हान देईल. याशिवाय कंपनीची नवीन बाईक Hero's HF Deluxe, Bajaj Platina 100 यांसारख्या बाइक्सना आव्हान देईल.

3. कसे असेल इंजिन

होंडाकडून सध्या फक्त बाईक लॉन्चची तारीख सांगण्यात आली आहे. बाईकमध्ये दिलेले 100 सीसी इंजिन बाईकला आठ हॉर्सपॉवर आणि आठ न्यूटन मीटर टॉर्क देईल अशी अपेक्षा आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 60 ते 70 किलोमीटरपर्यंत चालवता येते. हे चार गियर ट्रान्समिशनसह आणले जाऊ शकते. त्याची किंमत 60 ते 65 हजार रुपयांपर्यंत असू शकते.

4. होंडा करते या बाईकची विक्री

होंडाकडून भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आठ बाइक्स विकल्या जातात. यामध्ये CD110, Livo, Shine, SP125, Unicorn, X Blade, Hornet, CB200X यांसारख्या बाइक्सचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

RCB vs GT IPL 2026 Final: अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स 'टाय टाय फिस'; गिल-सुदर्शन-बटलर फ्लॉप

SCROLL FOR NEXT