Hero Passion Plus Saam tv
लाईफस्टाईल

Hero Passion Plus : प्रतीक्षा संपली ! तीन वर्षानंतर पॅशन नव्या रुपात, नव्या ढंगात लॉन्च; पाहा किंमत

Hero Passion Plus Price : पॅशन नेहमीच प्रवासी मोटरसायकलमध्ये खूप लोकप्रिय आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hero MotoCorp Specification : Hero MotoCorp ने पॅशन प्लस भारतीय बाजारपेठेत पुन्हा लाँच केले आहे. हिरो पॅशन प्लस बाईकची एक्स-शोरूम किंमत 76,301 रुपये आहे. या किंमतीत, पॅशन प्लस मोटारसायकल स्प्लेंडर प्लस (स्प्लेंडर प्लस) आणि स्प्लेंडर प्लस एक्सटेक (स्प्लेंडर प्लस एक्सटेक) यांच्या किंमती सध्या स्थिर आहे. पॅशन नेहमीच प्रवासी मोटरसायकलमध्ये खूप लोकप्रिय आहे. या अपडेटसह ३ वर्षानंतर निर्मात्याने मोटरसायकलमध्ये काही नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत.

ग्राहकांच्‍या सतत वाढत असलेल्‍या मागण्‍यांची पूर्तता करत पॅशन+ स्‍टाइल, आरामदायीपणा व सोयीसुविधेसाठी ही खास सोबती आहे, ज्‍यामुळे ही मोटरसायकल (Bike) दैनंदिन प्रवासासाठी चांगली आहे. नवीन मोटरसायकलच्‍या डिझाइनला नवीन रूप देण्यात आले आहे, तसेच राइडर्ससाठी युटिलिटी व कम्‍फर्ट फॅक्‍टरमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे.

हिरो मोटोकॉर्पचे चीफ ग्रोथ ऑफिसर (सीजीओ) रणजीवजीत सिंग म्‍हणाले, मोटरसायकल श्रेणीमध्‍ये स्‍टाइल, विश्‍वसनीयता व आरामदायीपणाच्‍या घटकांना परिभाषित केलेला प्रतिष्ठित ब्रॅण्‍ड पॅशनमध्‍ये गेल्‍या दशकभरात परिवर्तन झाले आहे.

ब्रॅण्‍डवरील ग्राहकांचा विश्‍वास आणि पॅशनप्रती त्‍यांची अविरत आवड यामुळे आम्‍हाला या मोटरसायकलला नवीन अवतारामध्‍ये सादर करण्‍याची प्रेरणा मिळाली आहे. स्टायलिश लुक्‍स (Look) आणि राइडर्सच्‍या सोयीसुविधेसाठी ही बाईक ग्राहकांच्या पसंतीस येईल असे त्यांनी सांगितले आहे.

1. स्‍टायलिंग

नवीन हिरो पॅशन+ मध्‍ये जुन्‍या वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. तसेच ही मोटरसायकल समकालीन आहे. सर्वात मोठ्या व व्‍यापक प्रतिष्‍ठेसह पुनरागमन केलेल्‍या पॅशन+ मध्‍ये लुकही नवीन आहे, जो स्‍टायलिश ग्राफिक्‍ससह सुधारण्‍यात आला आहे. हँडलवरील आकर्षक क्रोम फिनिश, मफलर कव्‍हर व युटिलिटी केस आणि सिग्‍नेचर ड्युअल टोन प्रतिष्ठित मोटरसायकल स्‍टायलिंग आहेत.

2. सोयीसुविधा

आरामदायीपणा व सोयीसुविधा या वैशिष्‍ट्यांची भर करत विभागातील बिगेस्‍ट युटिलिटी केस प्रवासादरम्‍यान आवश्‍यक असलेल्‍या सर्व गोष्‍टींसाठी एैसपैस जागा देते. डिजि अॅनालॉग क्‍लस्‍टरमध्‍ये आय ३एस बटन, साइड-स्‍टॅण्‍ड इंडिकेटर, स्‍पीडोमीटर, ट्रिप मीटर, ओडोमीटर, फ्यूएल गॉज, हेडलाइट इंडिकेटर्स, टर्न इंडिकेटर्स आहेत, जे सुलभपणे वाचता येतात. तसेच समाविष्‍ट करण्‍यात आलेले मोबाइल चार्जिंग पोर्ट राइडर्सना चालता-फिरता मोबाइल चार्ज करण्‍याची सुविधा देते.

3. आरामदायीपणा

आकर्षक सीट व लो सॅडल उंची (७९० मिमी)च्‍या माध्‍यमातून उच्‍च दर्जाचे एर्गोनॉमिक्‍स राइडर्स व सह-प्रवाशाला सुलभ उपलब्‍धता आणि उच्‍च दर्जाच्‍या आरामदायीपणाची खात्री देतात. राइडरसाठी राइडिंग कम्‍फर्टमध्‍ये आरामदायी एर्गोनॉमिक ट्रायंगलच्‍या माध्‍यमातून अधिक वाढ करण्‍यात आली आहे, जे सक्रिय व प्रत्येकवेळी आरामदायी सीटिंग स्थिती देते.

4. इंजिन

नवीन पॅशन+ मध्‍ये अत्‍यंत विश्‍वसनीय व इंधन-कार्यक्षम १०० सीसी बीएस-६ आणि ओबीडी-२ फेज ए प्रमाणित इंजिन आहे, जे ८००० आरपीएममध्‍ये ५.९ केडब्‍ल्‍यू पॉवर आऊटपुट आणि ६००० आरपीएममध्‍ये ८.०५ एनएम टॉर्कची निर्मिती करते. ब्रॅण्‍डच्‍या कार्यक्षमता व आरामदायीपणाप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत मोटरसायकलमध्‍ये सर्वोत्तम इंधन कार्यक्षमतेसाठी पेटण्‍टेड आय३एस तंत्रज्ञान आहे.

5. रंग

तीन कलर स्किम्‍स - स्‍पोर्ट रेडसह ब्‍लॅक, ब्‍लॅकसह नेक्‍सस ब्‍ल्‍यू आणि ब्‍लॅकसह हेवी ग्रे हे रंग आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT