कोमल दामुद्रे
लसणाची तिखट चव वेगवेगळ्या पाककृतींना अप्रतिम चव देते.
लसणाच्या लहान पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स तसेच अँटीमायक्रोबियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.
रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने चयापचय वाढतो.
एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, उच्च रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित होतो.
लसूण सकाळी उठल्यावर चावून खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होईल.
लसूण तुमच्या मेंदूचे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करते. ज्यामुळे अल्झायमर सारख्या संज्ञानात्मक आजार होतात.
लसूण खाणे माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. यामुळे आपला मेंदू संतुलित राहतो आणि नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते.
लसूण आपल्या शरीराचे संपूर्ण डिटॉक्सिफिकेशन करण्यास मदत करते. हे दीर्घकालीन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.