Vastu tips, Wind chimes tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

घरासाठी विंड चाइम्स विकत घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

आपल्यापैकी बरेचजण वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू खरेदी करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : विंड चाइमला फेंगशुई असे म्हटले जाते. हे मुळात चिनी वास्तुशास्त्र आहे. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अधिक महत्त्व दिले जाते. आपल्यापैकी बरेचजण वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू खरेदी करतात.

हे देखील पहा-

वास्तूनुसार अनेक वस्तू घरात आणल्याने किंवा लावल्याने आनंदाचा मार्ग खुला होण्यास मदत होते. तर आपण वास्तुशास्त्राच्या नियमांकडे लक्ष दिले नाही तर आपले नुकसान होते. वास्तुशास्त्रामध्ये, विंड चाइम हे सकारात्मक ऊर्जेसाठी ओळखले जातात, परंतु योग्य विंड चाइम कोणते? ते खरेदी करताना काय काळजी (Care) घ्यावी? ते घरी आणण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या हे पाहूया

१. घरात कुठेही विंड चाइम लावल्याने घरात अशांतता आणि संकटाचे वातावरण निर्माण होते. त्यासाठी विंड चाइम हे नेहमी योग्य दिशेला लावावे. घराच्या पश्चिम आणि उत्तर दिशेला धातूचा विंड चाइम लावणे योग्य मानले जाते. तर लाकडापासून बनवलेले विंड चाइम नेहमी पूर्व आणि दक्षिण दिशेला लावावेत.

२. बेडरूमसाठी विंड चाइम खरेदी करत असताना ९ रॉडचा खरेदी करावा. त्यामुळे नवरा-बायकोमधील संबंध अधिक दृढ होऊन त्यांच्यात प्रेम आणि आदर कायम राहतो. कोणत्याही प्रकारचे विंड चाइम आपण बेडरूममध्ये लावल्यास आपल्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात.

३. विंड चाइम हे स्वयंपाकघरात (Kitchen) किंवा पूजाघरात कधीही लावू नये. स्वयंपाकघर हा उर्जेचा स्त्रोत मानला जातो. तर पूजास्थान हे देवतांचे स्थान आहे. असे केल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

४. खिडकी किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी विंड चाइम लावावे. यामुळे हवा खेळती राहून नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते.याशिवाय दारात किंवा मोठ्या खोलीत छोटा विंड चाइम लावणे टाळा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही.

५. विंड चाइम अशा जागी लावा ज्या ठिकाणी कोणी जाणार नाही अथवा त्याच्या खाली कोणी बसणार नाही यासंबंधीत गोष्टीकडे लक्ष न दिल्यास घरातील सदस्यांना आर्थिक संकट आणि आरोग्याशी (Health) संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

SCROLL FOR NEXT