Liver Infection SAAM TV
लाईफस्टाईल

Liver Infection: लिव्हरला सूज आल्यानंतर दिसून येतात ५ लक्षणं; यकृताचं इन्फेक्शन ठरू शकतं जीवघेणं

Liver inflammation symptoms infection risk: यकृत हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयवांपैकी एक आहे. चुकीचा आहार, मद्यपान, औषधांचा अतिरेक किंवा संसर्गामुळे यकृताला सूज येऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही काळापासून देशात हेपेटायटीसच्या रूग्णांचा आकडा अचानक वाढलेला दिसतोय. हा आजार इतका गंभीर असतो की याला अनेकदा 'सायलेंट लिव्हर किलर' असं म्हणतात. कारण अनेकदा ही समस्या लक्षात न येता वाढत असते. या समस्येमुळे तुमच्या लिव्हरला गंभीर इजा होते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या आजाराने ग्रस्त असलेल्या असलेल्या व्यक्तींना बरेच वर्ष कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. यामुळे या समस्येचं निदान करणं कठीण असतं. वेळेत उपचार झाले नाही तर याचा विपरीत परिणाम लिव्हरवर होतो.

हेपेटायटिस म्हणजे काय?

सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास हेपेटायटिस म्हणझे यकृताला येणारी सूज. ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते. हेपेटायटिसमुळे लिव्हरच्या वॉलला सूज येऊन त्याच्या कामात अडथळा येतो. हेपेटायटिस A, B, C मध्ये लिव्हरची सूज वाढून त्याची कार्यक्षमता कमी होते.

हेपेटायटिसची लक्षणं काय आहेत?

गेल्या काही काळात रुग्णसंख्या वाढल्यामुळे डॉक्टरांनी लोकांना सुरुवातीची लक्षणं ओळखण्याचं आवाहन केलंय.

सतत थकवा

पूर्ण झोप झाल्यानंतरही असामान्य थकवा जाणवणे हे लिव्हरला सूज येण्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

अनपेक्षित वजन कमी होणं

आहार किंवा व्यायामात बदल न करता अचानक वजन कमी होत असेल तर सावध व्हा. हे लिव्हर नीट कार्य करत नसल्याचे संकेत असू शकतात.

भूक कमी होणं

हेपेटायटिसमुळे भूक कमी होते किंवा विशेषतः तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा राहत नाही.

त्वचा किंवा डोळे पिवळे पडणं

लिव्हरचं कार्य बिघडल्यामुळे रक्तात Bilirubin वाढतं. यामुळे तुमची त्वचा आणि डोळे पिवळसर दिसू लागतात.

लघवीचा रंग गडद होणं

जर नेहमीपेक्षा तुमच्या लघवीचा रंग गडद होत असेल तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. याचा अर्थ तुमच्या लिव्हरवर ताण येत असल्याचं किंवा हेपेटायटिसचं लक्षणं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI Central Contracts: रोहित-विराटला झटका तर गिलचं होणार प्रमोशन? बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: मनसेच्या उमेदवारांची यादी आजही जाहीर होणार नाही?

Namo Bharat : धक्कादायक! नमो भारत ट्रेनमधील 'त्या' कपलचा दुसरा व्हिडिओ व्हायरल

Aamir Khan-Kiran Rao : आमिर खानच्या दुसऱ्या बायकोवर झाली शस्त्रक्रिया, फोटो शेअर करत सांगितलं नेमकं काय झालं?

BMC Election: आधी स्वबळाची घोषणा, ऐनवेळी वंचितशी युती; BMCसाठी काँग्रेसला का हवी आंबेडकरांची साथ,नवी आघाडीची रणनीती काय?

SCROLL FOR NEXT