Surabhi Jayashree Jagdish
पोटात कॅन्सरची गाठ तयार होत असताना सुरुवातीला शरीरात काही बदल दिसून येतात.
जी दिसतात ती सामान्य पोटाच्या समस्यांसारखी वाटू शकतात. परिणामी त्यांचं निदान होण्यास उशीर होऊ शकतो.
यामध्ये कोणत्या लक्षणांचा समावेश आहे ते पाहूयात.
अपचन, ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ होणे, जे औषधांनीही पूर्णपणे बरं होत नाही.
थोडे खाल्ल्यानंतरही पोट भरलेले आणि फुगल्यासारखं वाटत असेल तर हे देखील पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
भूक कमी लागणे किंवा खाण्याची इच्छा न होणं हेही एक लक्षण मानलं जातं.
कोणताही प्रयत्न न करता अचानक आणि लक्षणीयरीत्या वजन कमी होणे हे कर्करोगाचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.