Hemoglobin Deficiency Saam Tv
लाईफस्टाईल

Hemoglobin Deficiency : शरीरात रक्ताची कमतरता जाणवतेय? 'या' पदार्थांचे करा सेवन

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकदा थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्याची समस्या जाणवू शकते.

कोमल दामुद्रे

बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत जातात. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकदा थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्याची समस्या जाणवू शकते.

जर आपल्या रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर शरीरात (Health) अशक्तपणा येतो आणि दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करणे कठीण होते. हिमोग्लोबिन हे लोह-आधारित प्रथिने रक्त पेशींमध्ये असते. जे शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. यासाठी तुम्हाला काही लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे लागेल, तरच हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करणे शक्य होईल. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी कोणते ड्रायफ्रुट्स फायदेशीर (Benefits) ठरू शकतात हे जाणून घेऊया.

अक्रोड

Walnut

अक्रोड हे एक असे ड्रायफ्रूट आहे ज्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. मूठभर सोललेल्या अक्रोडातून शरीराला सुमारे ०.८२ मिलीग्राम लोह मिळते. जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर दररोज अक्रोडाचे सेवन करावे.

पिस्ता

Pistachio

मूठभर पिस्त्यामध्ये १.११ मिलीग्राम लोह असते. नियमित आहारात याचा समावेश केल्यास शरीरात लोहाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

काजू

Cashew

अनेक मिठाई आणि पाककृतीमध्ये काजूचा वापर केला जातो, मूठभर काजूमध्ये सुमारे १.८९ मिलीग्राम लोह असते. लोह आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे.

बदाम

Almonds

आपण रोज बदाम खावेत असे अनेकदा म्हटले जाते, परंतु जर तुमचे शरीर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्त झाले असेल तर दररोज सकाळी भिजवलेले बदाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT