सध्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. यामध्ये कोलेस्ट्रॉलचीही समस्या आहे. शरीरात जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयातील रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि बंद पडलेल्या रक्तवाहिन्या पुन्हा उघडण्यासाठी एंजिओप्लास्टी ही एक महत्त्वाची वैद्यकीय प्रक्रिया केली जाते. ओपन हार्ट सर्जरीशिवाय हृदयाच्या स्नायूंना योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन मिळावा, यासाठी ही प्रक्रिया केली जाते.
या वैद्यकीय भाषेत परक्युटेनियस कोरोनरी इंटरव्हेन्शन असंही म्हणतात. डॉक्टर या प्रक्रियेची गरज आहे की नाही हे विविध चाचण्या जसं की एंजिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, ECG यावरून ठरवतात. मात्र याची काही लक्षणंही आहेत. ही लक्षणं नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया.
जर तुम्हाला छातीत वारंवार जडपणा किंवा वेदना जाणवत असतील तर ती लक्षणं एंजायनाची असू शकतात. हा त्रास हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असल्याचं संकेत देतो. हा वेदना केवळ छातीपुरती मर्यादित न राहता, हात, मान किंवा पाठीतही पसरू शकते.
जर तुमच्या पायांमध्ये चालताना वेदना होत असतील तर हे ‘पेरिफेरल आर्टरी डिजीज’चं लक्षण असू शकतं. यामध्ये शरीराच्या इतर भागांमध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. अशामध्ये वेळेवर उपचार न केल्यास ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. अशावेळी एंजिओप्लास्टीची गरज भासू शकते.
कोणतेही शारीरिक श्रम न करता जर सतत थकवा जाणवत असेल, दम लागत असेल किंवा झोपेतून उठतानाही थकल्यासारखं वाटत असेल तर ही हृदयविकाराची सुरुवात असू शकते. विशेषतः जर हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल, तर डॉक्टर काही टेस्ट सुचवून एंजिओप्लास्टीचा विचार करू शकता.
जर तुमचा ब्लड प्रेशर सातत्याने जास्त राहत असेल आणि ते औषधांनीही नियंत्रणात राहत नसेल तर हृदयावर सततचा ताण निर्माण होतो. यामुळे हृदय झपाट्याने थकू लागतं आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
झोपताना जर वारंवार श्वास अडकत असेल किंवा अचानक घाबरून जाग येत असेल तर ही स्थिती ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एप्नियामुळे होऊ शकते. यामध्ये मेंदू आणि हृदयाला ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतो, ज्यामुळे हृदयाच्या गतीवर परिणाम होतो. ही सुद्धा अशी स्थिती आहे ज्यामध्ये डॉक्टर कधी कधी एंजिओप्लास्टीचा विचार करतात.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.