Heart Attack In Youth
Heart Attack In Youth  Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Attack In Youth : तरुणांमध्ये वाढतेय हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण, 'या' लोकांना घ्या विशेष काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Heart Attack In Youth : कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. जे लोक धूम्रपान करतात आणि मधुमेहासह उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप जास्त असतो.

भारतातील हृदयाशी संबंधित आजारांची (Disease) प्रकरणे जागतिक सरासरीपेक्षा खूप जास्त आहेत, ही चिंतेची बाब आहे.

भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अलीकडच्या काही महिन्यांत बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक अभिनेते-अभिनेत्रींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

वृद्ध लोकांच्या तुलनेत तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत ज्यात जिममध्ये व्यायाम करताना, रस्त्याने चालताना आणि लग्नात नाचताना अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यांचा जागीच मृत्यू होतो.

अशी प्रकरणे भारतातच नाही तर जगभर समोर येत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराच्या या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

एका वृत्तवाहीनीशी बोलताना मॅक्स हॉस्पिटलचे प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. विवेक कुमार यांनी सांगितले की, कोविड 19 महामारीच्या काळात ज्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप जास्त आहे.

हा धोका केवळ कोरोना महामारीच्या काळातच नाही तर त्यानंतर एक वर्षानंतरही रुग्णांमध्ये आढळून आला. कोविडनंतरच्या लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातही हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Rules: चालत्या ट्रेनमध्ये 'या' गोष्टी केल्यास तुम्ही घरात नाही तर थेट तुरुंगात

Brushing Tips: दातांच्या हेल्दी आरोग्यासाठी जाणून घ्या, किती मिनिटे ब्रश करावा

Today's Marathi News Live : ही लढाई देशासाठी; उद्धव ठाकरे जालन्यातून कडाडले

Navneet Rana: हैदराबादमध्ये येते कोण अडवते बघतेच..., नवनीत राणा यांचा ओवैसी बंधूंना थेट इशारा

Lok Sabha Election : ऐन निवडणुकीत मतदान ओळखपत्र आढळली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात; जालना शहरातील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT