Heart Attack : नववर्षात जीमची मेंमबरशिप घेण्यापूर्वी आरोग्याच्या 'या' तपासण्या करा; हृदयविकाराच्या झटक्यापासून राहाल दूर !

2022 मध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक वाढलेले दिसून आले.
Heart Attack
Heart AttackSaam Tv
Published On

Heart Attack : 2022 मध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक वाढलेले दिसून आले. काहींना वर्कआउट करताना आपला जीव गमवावा लागला तर काहींना झोपेतच. या हृदयविकाराचे सगळ्यात जास्त बळी हे तरुण मंडळीच होती.

कोविड-19 च्या साथीमुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की शरीराचा कोणताही भाग या विषाणूच्या प्रभावापासून वाचलेला नाही. कोरोनाच्या काळात घरून काम केल्यानंतर प्रत्येकाचे वजन वाढले त्यामुळे वर्कआउट (Workout) करण्याखेरीज कोणाकडेही इतर पर्याय नव्हते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य वाढवण्यासाठी सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा, या तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही लोक जिममध्येही सहभागी झाले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जिममध्ये एकामागून एक आकस्मिक मृत्यूंमुळे व्यायामाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांपैकी एकजिम सुरू करण्यापूर्वी आरोग्य (Health) तपासणी करणे आवश्यक आहे का? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.

Heart Attack
Heart Attack in Winter : हिवाळ्यात का वाढते हार्ट अटॅकचे प्रमाण? जाणून घ्या, कारण

1. जिम सुरू करण्यापूर्वी आरोग्य तपासणी करा

जिमला जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी करावी की नाही याविषयी, डॉ. राजीव डांग, म्हणतात की, अतिव्यायाम आणि औषधे किंवा सप्लिमेंट्स असल्यास याची गरज असते.

डॉ.डांग सांगतात की, व्यायामाशी संबंधित कोणतीही योजना बनवण्यापूर्वी तुमच्या शरीराची क्षमता जाणून घेतली पाहिजे. कारण सप्लिमेंट घेत असलेल्या तरुण मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या बिघाडाची अनेक प्रकरणे पाहिली आहेत. तसेच यावर डॉ. ब्रह्मदत्त पाठक म्हणतात आरोग्य तपासणी शरीराच्या मूलभूत अंतर्गत वातावरणाबद्दल सांगते, ज्यामुळे व्यायामाचा प्रकार निवडणे सोपे होते.

2. जिमला जाण्यापूर्वी करण्यापूर्वी ही चाचणी करून घ्या

डॉ. डांग स्पष्ट करतात की जिम सुरू करण्यापूर्वी, हृदय आणि फुफ्फुसाची तपासणी करणे फायदेशीर ठरू शकते ज्यामध्ये महत्त्वाची नाडी, रक्तदाब, SPO2, रक्तातील साखर आणि शरीरातील इतर अवयव जसे की CBC, मूत्रपिंडाचे कार्य आणि यकृताचे कार्य यांचा समावेश होतो. याशिवाय हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाईल, थायरॉईड प्रोफाइल, ईसीजी यांसारख्या रक्ताच्या तपासण्या कराव्यात.

3. ट्रेनरला तुमच्या वैद्यकीय स्थितीबद्दल माहिती द्या

डॉ विरल पटेल म्हणतात, एखाद्या व्यक्तीला पाठदुखी किंवा मणक्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, त्यांनी तपासणी करून घ्यावी जेणेकरून जिम ट्रेनरला कळेल की तुमच्यासाठी कोणते व्यायाम योग्य आहेत. याशिवाय तुमचा काही मेडिकल हिस्ट्री असेल तर तुमच्या ट्रेनरला नक्की सांगा.

4. वर्कआउटचे फायदे आणि तोटे दोन्ही जाणून घ्या

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वजन कमी करणे आणि वजन वाढण्यापेक्षा वर्कआउटचा श्वसनाचा फिटनेस, स्नायू टोनिंग, ताकद, मानसिक संतुलन यांच्याशी जास्त संबंध आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकीचे किंवा जास्त वर्कआउट केले तर ते फायद्याऐवजी नुकसानही करेल.

5. या व्यायामाच्या सवयी आरोग्यासाठी हानिकारक आहेत

  • जर तुम्ही फिटनेस फ्रीक होण्यासाठी आठवडाभर व्यायाम करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी खूप जास्त असू शकते.

  • तसेच वॉर्म अप वगळू नका.

  • वर्कआउट करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच व्यायामापूर्वी आणि नंतर शरीराला योग्य विश्रांती देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

  • कोणत्याही ट्रेंडचे आंधळेपणाने अनुसरण करण्याऐवजी, आपल्या क्षमतेनुसार वर्कआउट निवडणे चांगले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com