Healthy Heart After 40 google
लाईफस्टाईल

Heart Attack कधीच येणार नाही! वेळीच करा 'हे' बदल; चाळीशीनंतरही हृदय निरोगी राहील

Health Tips: योग्य आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे आणि वेळेवर तपासणी केल्यास चाळीशीनंतरही हृदय निरोगी ठेवता येते, असे तज्ज्ञ सांगतात.

Sakshi Sunil Jadhav

हार्ट अटॅक हा जगभरात मृत्यूचं प्रमुख कारण मानला जातो. दिलासादायक बाब म्हणजे योग्य जीवनशैली फॉलोकेल्याने हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. तज्ज्ञांच्या मते, दैनंदिन सवयींमध्ये छोटे बदल केल्याने तुम्ही एक हेल्दी लाइफ जगू शकता.

आहाराचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. भाजीपाला, फळं, धान्य, डाळी, मासे, बदाम, अक्रोड यांसारखे पौष्टिक घटक आहारात घेतल्याने तुमचं Heart सुरक्षित आणि मजबूत राहतं. जास्त तेलकट, तळलेले पदार्थ, जास्त मीठ आणि साखरेचं सेवन केल्याने कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तळलेले पदार्थ टाळून उकडलेले किंवा ग्रिल केलेले अन्न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

शारीरिक हालचाल ही हृदयरोग टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दर आठवड्याला किमान 150 मिनिटं मध्यम स्वरूपाचा व्यायाम केल्याने हृदयाची कार्यक्षमता सुधारते. नियमित चालणे, सायकल चालवणे किंवा हलका व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते, रक्तदाब कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. अगदी लिफ्टऐवजी जिने वापरण्यासारख्या छोट्या सवयीही फायदेशीर ठरतात.

धूम्रपान हे हृदयरोगाचे मोठे कारण आहे. सिगारेटमधील विषारी घटक रक्तवाहिन्यांना इजा करतात आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढवतात. अनेक वर्षे धूम्रपान केले असले तरी ते थांबवल्याने काही महिन्यांतच हृदयाच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतात. तसेच अप्रत्यक्ष धूम्रपानही तितकेच घातक असल्याने धूम्रपानमुक्त वातावरण ठेवणे आवश्यक आहे.

नियमित आरोग्य तपासणीमुळे हृदयरोगाचा धोका वेळेवर ओळखता येतो. रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉल तपासल्यास उच्च रक्तदाब किंवा प्रीडायबेटीससारख्या समस्या गंभीर होण्यापूर्वी नियंत्रणात आणता येतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक बदल केल्यास हृदय सुरक्षित राहते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद झाला, तुम्हालाही ₹१५०० येत नाही? अधिकारी सांगणार अपात्रतेचं कारण

Rashmika Mandanna Coorgi Saree : रश्मिका मंदानाच्या 'कोडवा' स्टाइल साडीची बातच न्यारी; 'अशी' नेसा, सर्वजण पाहातच राहतील

ABC Juice For Glowing Skin: ५० व्या वर्षीही दिसतेय विशीतली तरूणी! मलायका अरोराच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट, काय आहे ABC ज्यूस

Lung cancer: नखांमध्ये हे बदल दिसले तर समजा फुफ्फुसांचा कॅन्सर झालाय; काय आहेत लक्षणं वाचा

SCROLL FOR NEXT