Signs of Heart Attack saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack: हार्ट अटॅक येण्याच्या २ दिवसांपूर्वी दिसतात 'ही' लक्षणं; वेळीच व्हा सतर्क

Signs of Heart Attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमचं शरीर तुम्हाला संकेत देतं. ही लक्षणं कोणती आहे ते ओळखणं फार महत्त्वाचं असतं. ही लक्षणं नेमकी कोणती आहे ती पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

छातीत अचानक वेदना होणं किंवा जळजळ होणं असा त्रास आपल्याला झाल्यावर अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर ही किरकोळ दिसणारी चिन्हे एक मोठी धोक्याची घंटा असतील तर? हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही. हा झटका येण्यापूर्वी तुम्हाला काही लक्षणं दिसून येतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेकजण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. आपल्याला थकवा जाणवते असेल या विचाराने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र जर वेळीच ही लक्षणं ओळखली तर आणि सतर्क राहिलो तर तुमचा जीव वाचू शकतो.

हार्ट अटॅकच्या ४८ तास अगोदर दिसणारी लक्षणं

  • हार्ट अटॅकच्या १-२ दिवसांपूर्वी अनेकांना छातीत जडपणा, जळजळ किंवा दाब जाणवू शकतो. ही वेदना कधीकधी छातीच्या मध्यभागी देखील होऊ शकतो. याशिवा अनेकांना डाव्या हाताला किंवा पाठीत देखील वेदना होतात.

  • विश्रांती घेतल्यानंतरही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा शरीर अचानक सुस्त वाटत असेल तर हे हृदयविकाराचे एक प्रमुख लक्षण मानलं जातं.

  • जर तुम्हाला कोणताही व्यायाम न करताही श्वास लागत असेल तर किंवा पायऱ्या चढण्यास त्रास होत असेल तर हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं.

  • कोणत्याही कारणाविना पोट खराब होणं, उलट्या होणं किंवा चक्कर येणं हे देखील हृदयाची स्थिती दर्शवते.

कोणत्या व्यक्तींनी घ्यावी अधिक काळजी?

  • उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

  • लठ्ठपणा आणि तणावाशी असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

  • धूम्रपान करणाऱ्यांनाही याचा धोका अधिक आहे.

  • ज्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये यापूर्वीच हृदयाच्या आजारांचा धोका आहे.

लक्षणं जाणवल्यास काय केलं पाहिजे?

  • जर तु्म्हाला यापैकी कोणतीही लक्षणं आढळली तर ताबडतोब रूग्णालयात जाऊन ईसीजी काढावा.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका.

  • डॉक्टरकडे जाण्यास उशीर लावू नका.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT